Srinagar Terror Attack Dainik Gomantak
देश

Srinagar Terror Attack: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात पोलिस अधिकारी शहीद; मुलांसोबत क्रिकेट खेळताना हल्ला

टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी

गोमंतक ऑनलाईन टीम

Srinagar Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील ईदगाह परिसरात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक शहीद झाले. मसरूर अली वानी असे त्यांचे नाव आहे. मसरूर हे येचीपोरा ईदगाह भागातील रहिवासी होते. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मसरूर वानी स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. मसरूर यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही.

हल्ल्यानंतर ईदगाह परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सध्या सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे.

13 सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत 3 अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले होते. शहीद अधिकाऱ्यांमध्ये लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि पोलिस डीएसपी यांचा समावेश आहे. शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. तर

राजौरी येथे एका जवानाचा मृत्यू झाला. यावेळी दोन दहशतवादीही मारले गेले होते. मंगळवारी येथे शोध सुरू असताना लष्कराच्या एका कुत्र्याचाही मृत्यू झाला होता. त्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या हँडलरचा जीव वाचवला.

यावर्षी 26 दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी राजौरी-पुंछ जिल्ह्यात २६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर 10 सुरक्षा जवानही शहीद झाले आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी पत्राडा येथील जंगलात शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू असताना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गोळीबार करण्यात आला. मात्र, दोन्ही संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले.

10 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील अल्शिपोरा, शोपियाँ येथे लष्कराच्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. मोरीफत मकबूल आणि जाजीम फारुक उर्फ ​​अबरार अशी त्यांची नावे आहेत. दोघेही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने 15 ऑगस्टपूर्वी संयुक्त कारवाईत 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दारूगोळा आणि शस्त्रे जप्त केली होती.

पहिले प्रकरण 9 ऑगस्टच्या रात्रीचे आहे, जिथे कोकरनागच्या अथलन गडोले येथे तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. या चकमकीत लष्कराच्या जवानासह तीन जण जखमी झाले.

दुसरे प्रकरण बारामुल्ला येथील उरीचे आहे, जिथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लष्कराच्या 3 दहशतवाद्यांना पकडले. एका संशयिताकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT