Pernem constituency: गेल्या 46 वर्षांपासून पेडणे मतदारसंघ राखीव; आता आणखी नको; धारगळ ग्रामसभेत ठराव

विधानसभा निवडणुकीपुर्वी मतदारसंघ पुनर्रचना करण्याची मागणी
Pernem constituency
Pernem constituencyDainik Gomantak
Published on
Updated on

Pernem constituency: गोव्यात रविवारी 29 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील गावांमध्ये ग्रामसभा पार पडल्या. यात धारगळमधील ग्रामसभेत झालेल्या एका ठरावाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

या ग्रामसभेत उत्तर गोव्यातील पेडणे विधानसभा मतदारसंघ आता यापुढे राखीव ठेऊ नका, असा ठराव करण्यात आला आहे.

गेल्या 46 वर्षांपासून पेडणे मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. गोव्यात पुढील विधानसभा निवडणूक 2027 साली होणार आहे. तोपर्यंत या आरक्षित मतदारसंघाला 50 वर्षे पूर्ण होतील.

Pernem constituency
Sanofi Pharma Goa: गोव्यातील महिलाही करणार 'नाईट शिफ्ट'; सनोफी फार्मा कंपनीला राज्य सरकारकडून परवानगी

त्या निवडणुकीकी पुर्वी किंवा मध्यावधी निवडणुका घोषित झाल्यास आचारसंहिता लागू होण्यापुर्वी पेडणे मतदारसंघांची पुनर्रचना करावी आणि या मतदारसंघावरील आरक्षण काढून टाकावे, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.

धारगळ, वारखंड, नागझर, उगवे, तांबोसे, मोपा, तोरसे, पत्रादेवी, ओझरी, कासारवर्णे, हळर्ण, तळर्ण, खुटवळ, हसापूर, चांदेल, हाळी, हाणखणे आणि इब्रामपूर ही गावे गेल्या 46 वर्षांपासून पेडणे राखीव मतदारसंघात आहेत.

ही सर्व गावे पुढील विधानसभा निवडणुकीपासून विना आरक्षित मतदारसंघात ठेवावीत.

वरील गावातील लोकांचा 46 वर्षांचा राजकीय अन्याय आणि सामाजिक असंतुलन दूर करून या ग्रामस्थांचा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ करावा, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com