Shafiqur Rahman Barq Dainik Gomantak
देश

'मुलांना जन्माला घालणं अल्लाहशी...', सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

समाजवादी पक्षाचे (एसपी) खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Shafiqur Rahman Barq 0n Population Control: लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे (एसपी) खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी आता आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मुले असणे अल्लाहशी संबंधित आहे: बर्क

खासदार शफी कुर रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'मुलाच्या जन्माचा संबंध माता-पित्याशी नसून अल्लाहाशी आहे. तो त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो.'

सरकारला सल्ला

सपाचे खासदार बर्क यांनी सरकारला (Government) सल्ला देताना सांगितले की, 'सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याऐवजी मुस्लिमांच्या (Muslim) शिक्षणाची व्यवस्था करावी. जेव्हा मुस्लिमांना शिक्षण मिळेल आणि आपला समाज शिक्षित होईल, तेव्हा वाढत्या लोकसंख्येची समस्या मिटेल.'

2024 च्या निवडणुकीची भूमिका

खासदार बर्क यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लोकांचा कल भाजपकडे (BJP) जाण्यासाठी आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करण्यासाठी सरकार अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप केला. सरकारचा हा दृष्टिकोन अयोग्य आहे.

काय म्हणाले सीएम योगी?

खरं तर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले होते की, 'राज्यातील वाढत्या लोकसंख्येला एक विशेष वर्ग जबाबदार आहे.' त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार करत बर्क म्हणाले, 'सरकार मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे मानते. मुस्लिम बांधवांचे मनोधर्य खचवण्यासाठी सातत्याने मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्याविषयी बोलतं आहे. तर कधी वाढत्या लोकसंख्येसाठी मुस्लिमांना जबाबदार धरते. देशातील बेरोजगारी, महागाई यांसारख्या समस्यांपासून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी भाजप प्रचाराअंतर्गत अशी वक्तव्य करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT