'लोकसंख्येचा स्फोट कोणत्याही धर्माचं नाही, तर देशाचं संकट' मुख्तार अब्बास यांचा योगींना टोला

योगी आदित्यनाथ यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांचे वक्तव्यही समोर आले आहे.
Mukhtar Abbas Naqvi  and CM Yogi
Mukhtar Abbas Naqvi and CM Yogi Dainik Gomantak

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांचे वक्तव्यही समोर आले आहे. लोकसंख्येचा प्रचंड स्फोट हा कोणत्याही धर्माचा नसून देशाचा प्रश्न असल्याचे त्यांनी मंगळवारी ट्विट करून म्हटले आहे. लोकसंख्येचा मुद्दा जात किंवा धर्माशी जोडणे उचीत नसल्याचे अब्बास यांनी म्हटले आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनी नुकताच केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे.

काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले होते की, 'लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करत असतानाच समाजातील लोकसंख्येचे संतुलन बिघडू नये याकडे लक्ष दिले पाहिजे. विशिष्ट वर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. इथल्या मूळ लोकांची लोकसंख्या कमी होईल, असं व्हायला नको. ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, तिथे लोकसंख्येचा असमतोल चिंतेची बाब बनली आहे. याचा विविध धर्मांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर अराजकता निर्माण होते.'

Mukhtar Abbas Naqvi  and CM Yogi
भारताविरुद्ध पाक-चीनची हातमिळवणी, शांघाय किनारी क्षेत्राजवळ फायर ड्रिल करणार

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते शफीकुर रहमान यांनी म्हटले आहे की, मुले होण्याचा थेट संबंध मानवाशी नसून, मुले अल्लाहशी संबंधित असतात. जर अल्लाहने मूल जन्माला घातले, तर तो मुलाची काळजी घेणार्‍यालाही जन्माल घालतो. दुसरीकडे, लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी पक्षीय राजकारणाच्या वरती उठून योग्य ती पावले उचलली पाहिजेत, कारण प्रत्येकाचे भवितव्य याच्याशी निगडित आहे, असे भाजपने म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com