Abdullah Azam Khan Dainik Gomantak
देश

Abdullah Azam Khan: आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला खान यांना मोठा झटका, आमदारकी हिरावली

SP MLA Abdullah Azam Khan: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

SP MLA Abdullah Azam Khan: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आझम खान यांना मोठा झटका बसला आहे. त्यांची आमदारकी हिरावण्यात आली आहे. अब्दुल्ला आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने स्वार विधानसभा जागा रिक्त झाली आहे.

दरम्यान, विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली. अब्दुल्ला आझम खान हे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामपूर जिल्ह्यातील स्वार विधानसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

याआधी, सोमवारी मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना 15 वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

जिल्हा सरकारी वकील (गुन्हे) नितीन गुप्ता यांनी सांगितले की, पोलिसांशी (Police) झालेल्या वादात आझम खान यांच्यासह नऊ जणांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात येथील एमपीएमएलए न्यायालयाच्या (Court) न्यायमूर्ती स्मिता गोस्वामी यांनी सोमवारी आझम खान यांना दोषी ठरवले. त्याचबरोबर, पुत्र अब्दुल्लासह त्यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दुसरीकडे, अब्दुल्ला आझम आता आझम खान यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत, ज्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये अपात्र ठरवण्यात आले होते.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाईल आणि तुरुंगात राहिल्यानंतर सहा वर्षे अपात्रता कायम राहील. कायदेतज्ज्ञांच्या मते, पिता-पुत्र दोघांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT