SP leader Azam Khan: रामपूरचे माजी आमदार आझम खान आणि अब्दुल्ला यांना 15 वर्षे जुन्या प्रकरणात एमपीएमएलए न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोमवारीच न्यायालयाने पिता-पुत्रावर आरोप निश्चित केले. प्रकरण 2008 मधील आहे.
29 जानेवारी 2008 रोजी छजलत पोलिसांनी माजी सपा मंत्री आझम खान यांची गाडी तपासणीसाठी अडवली. आझम यांची गाडी थांबवल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या प्रकरणात अब्दुल्लासह नऊ जणांचा समावेश होता.
दरम्यान, पोलिसांनी (Police) या सर्वांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अमरोहाचे आमदार आणि नगीना आमदार यांच्यासह सात जणांचा समावेश होता, ज्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर आझम आणि अब्दुल्ला यांना या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
दुसरीकडे, पिता-पुत्राच्या शिक्षेबाबत न्यायालय अल्पावधीतच निकाल देऊ शकते. आझम खान यांच्यावर अनेक खटले सुरु आहेत. काही प्रकरणांमध्ये आझम खान आणि मुलगा अब्दुल्लाही तुरुंगात गेले आहेत. छजलत प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने आझम यांच्यावर अवमानाचा खटला दाखल करण्यात आला होता.
त्याचबरोबर, 2020 मध्ये छजलतमध्ये दाखल झालेल्या खटल्याची (174A) सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार होती. मुरादाबाद एमपीएमएलए कोर्ट ACJM-IV मध्ये सुनावणी सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी आझम खान 6 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर झाले.
तसेच, बचाव पक्षाचे वकील सय्यद शाह नवाज हुसेन म्हणाले की, जानेवारी 2008 मध्ये नोंदवलेल्या छजलत प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. या खटल्यात हजर न राहिल्याने न्यायालयाने (Court) आझम खान यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.
शिवाय, कलम 174 प्रकरणी सोमवारी सुनावणी होती. आझम खान न्यायालयात पोहोचले. हे प्रकरण राजकीय द्वेषाने प्रेरित असल्याचे सांगून खान यांनी हा भाग खोटा असल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणात बचाव पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब होणार आहेत. दुसरीकडे, विशेष सरकारी वकील मोहनलाल विश्नोई म्हणाले की, न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीसाठी 20 फेब्रुवारीची तारीख निश्चित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.