Azam Khan Twitter
देश

सपा नेते आझम खान यांची 27 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका, शिवपाल सिंह यादव स्वागतासाठी हजर

वडिलांच्या सुटकेवर मुलगा अब्दुल आझम यांनी सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Azam Khan Bail: फसवणूक प्रकरणात तुरुंगवास भोगलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान शुक्रवारी सीतापूर येथून तुरुंगाबाहेर आले. 27 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या आझम खान यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर काल रामपूर येथील विशेष न्यायालयाने आझम खानच्या सुटकेसाठी सीतापूर कारागृह प्रशासनाला पत्र पाठवले होते. दुसरीकडे, आझम खानच्या सुटकेदरम्यान सीतापूर कारागृहाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आझम खान सीतापूरहून थेट रामपूरला जाणार आहेत.

न्यायालय काय म्हणाले

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ए. s बोपण्णा यांनी घटनेच्या कलम 142 अन्वये विशेषाधिकार वापरून खान यांना जामीन मंजूर केला. जोपर्यंत नियमित जामीन अर्जावर न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांना अंतरिम जामिनावर सोडण्यात आले आहे, असे न्यायालयाने सांगितले. घटनेच्या कलम 142 अंतर्गत प्रदान केलेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे,असे खंडपीठाने म्हटले आहे.

आझम खान हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात जमीन हडपण्यासह इतर अनेक प्रकरणांमध्ये सीतापूर तुरुंगात बंद होते. त्याच्यावर जवळपास 90 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी त्यांना 88 प्रकरणात जामीन मिळाला आहे. ते फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात होते. त्याच्या सुटकेपूर्वी सीतापूर कारागृहाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.

19 मे रोजी सुप्रीम कोर्टाने आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आझम यांच्या सुटकेच्या आदेशाची प्रमाणित प्रत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तुरुंगात पोहोचू शकली नाही, त्यामुळे त्याची काल सुटका होऊ शकली नाही. वडिलांच्या सुटकेवर मुलगा अब्दुल आझम यांनी सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिल्याचे म्हटले आहे. हा न्यायाचा विजय आहे, असे उद्गार अब्दुल आझम यांनी काल काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT