Temba Bavuma Dainik Gomantak
देश

Ind Vs SA Test:'भारताला भारतात हरवायचं आहे'! सामन्यापूर्वी कर्णधार बवुमाने केले इरादे स्पष्ट; म्हणाला 'या' गोष्टीची प्रॅक्टिस करतोय..

Ind Vs SA Test Toss: संघात एडन मार्करम आणि रबाडासारखे सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले अफलातून खेळाडू आहेत, असा विश्वास बवुमाने व्यक्त केला.

Sameer Panditrao

कोलकाता: भारताला भारत पराभूत करून व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम करणाऱ्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला त्याचा सल्ला विचारला, जास्त काही मार्गदर्शन केले नाही, पण नाणेफेक जिंकण्याचा सराव कर, असे तो डोळे मिचकावत म्हणाला. त्यामुळे मी हा सराव करत आहे, असे अत्यंत मिश्कीलपणे तेंबा बवुमाने सांगितले.

दक्षिण आफ्रिकन संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ करून कसोटी विजेतेपदाची केवळ अंतिम फेरी गाठली नाही, तर ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. आमच्या देशात त्या एका घटनेने खूप सकारात्मक बदल झाले, पण आम्ही हे जाणून आहोत की त्यापासून प्रेरणा घ्यायची आहे आणि अजून चांगला खेळ करायचा आहे, कारण आता आमच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत, असे बवुमा म्हणाला.

कसोटी विजेतेपद आता मागे गेले आहे आणि आता भारतीय संघासमोरच्या सामन्याचे विचार करायला हवेत याची जाणीव आहे. भारतीय संघाला भारतात पराभूत करायचे स्वप्न आम्ही उराशी बाळगून आहोत. आम्हाला नवा इतिहास लिहायचा आहे. माझ्या संघात समतोल आहे. संघात एडन मार्करम आणि रबाडासारखे सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले अफलातून खेळाडू आहेत, असा विश्वास बवुमाने व्यक्त केला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. मालिका दोनच कसोटी सामन्यांची असल्याने पहिल्या सामन्याची उत्सुकता अजून वाढली आहे.

भारताच्या दौऱ्यावर येऊन भारतीय संघाला कसोटी मालिकेत पराभूत करायचे आव्हान सर्व परदेशी संघांना नेहमी खुणावत असते. भूतकाळावर नजर टाकली, तर न्यूझीलंड संघाचा सन्मानीय अपवाद वगळता बाकी तमाम संघांनी भारतीय संघासमोर नांगी टाकली असल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरची हकालपट्टी होणार का? BCCI सचिवांनी दिलं थेट उत्तर; म्हणाले 'त्यांना काढून टाकण्याची बातमीच...'

Ponda Accident: फोंड्यात वातावरण पेटले! डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली, ट्रकची केली नासधूस

Cigarette Price Hike: सिगारेट ओढणाऱ्यांसाठी चटका देणारी बातमी! 4 पटीने वाढणार किंमत; धूम्रपान करणाऱ्यांना सरकारचा मोठा धक्का

Rohit Sharma Viral Photo: 'मी रोहित शर्मासारखा दिसतोय हे ऐकून.. ', हिटमॅनसारख्या दिसणाऱ्या खेळाडूने जिंकले फॅन्सचे हृदय; पहा Video

Goa Dhirio: कोलवामध्ये पुन्हा 'धिरिओ'चा थरार; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, प्राणीमित्रांकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT