IND vs SA, Head To Head Record: ईडन गार्डन्स कोणासाठी लकी? टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कामगिरी कशी? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

IND vs SA 1 Test: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Team India Record
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs SA, Head To Head Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. युवा कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जवळपास सहा वर्षांनंतर या मैदानावर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी ईडन गार्डन्सवर टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड कसा आहे, यावर एक नजर टाकूया.

ईडन गार्डन्सवर टीम इंडियाचा कसोटी रेकॉर्ड

कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर टीम इंडियाने पहिला कसोटी सामना 1934 मध्ये खेळला होता. या मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 42 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 13 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर 9 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. उर्वरित 20 सामने ड्रॉ (Draw) झाले आहेत. या मैदानावर भारताला शेवटचा पराभव 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पत्करावा लागला होता. टीम इंडियाने ईडन गार्डन्सवर शेवटचा कसोटी सामना 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता, ज्यात भारताने एक डाव आणि 46 धावांनी मोठा विजय मिळवला होता.

Team India Record
IND vs SA Test: एकाचं त्रिशतक, तर 3 खेळाडूंची द्विशतकं...भारतीय फलंदाजांचा दबदबा; कसोटी मालिकेपूर्वी आफ्रिकेचे गोलंदाज टेन्शनमध्ये

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड टू हेड कसोटी रेकॉर्ड पाहता भारताचे पारडे जड आहे. दोन्ही संघांमध्ये या मैदानावर आतापर्यंत एकूण 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय नोंदवला, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ 1 सामन्यात विजय मिळवला.

भारतातील दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड खराब

भारतीय भूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी रेकॉर्डवर नजर टाकल्यास, त्यांची कामगिरी अतिशय खराब राहिली आहे. आफ्रिकेच्या संघाने भारतात आतापर्यंत 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ 5 सामन्यांमध्येच आफ्रिकेला विजय मिळाला आहे, तर 11 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 3 सामने ड्रॉ राहिले आहेत. विशेष म्हणजे, आफ्रिकेच्या संघाला भारतात गेल्या 15 वर्षांपासून कसोटी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. या आकडेवारीवरुन स्पष्ट होते की, घरच्या मैदानावर टीम इंडियाचा नेहमीच दबदबा राहिला आहे.

Team India Record
IND vs SA: दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतची धमाकेदार एंट्री; सोपवली उपकर्णधारपदाची जबाबदारी!

दोन्ही संघांचे कसोटी स्क्वॉड (Test Squads)

भारत: शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, टोनी डी जोरजी, जुबेर हमजा, सायमन हार्मर, मार्को जानसन, केशव महाराज, एडन माक्ररम, वियान मुल्डर, सेनुरन मुथुसामी, कगिसो रबाडा, रयान रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरिन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com