माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. SA20 लीगच्या आगामी हंगामापूर्वी सौरव गांगुलीची प्रिटोरिया कॅपिटल्सच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझीने रविवारी ही अधिकृत घोषणा केली.
संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले - प्रिन्स आता कॅपिटल्स कॅम्पमध्ये शाही रंग भरण्यास सज्ज आहे! सौरव गांगुली आमचा नवीन मुख्य प्रशिक्षक झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. व्यावसायिक क्रिकेट संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून गांगुलीचा हा पहिलाच कार्यकाळ असेल.
इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट यांनी कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गांगुलीची नियुक्ती झाली आहे.
यावेळी 2026 च्या टी20 विश्वचषकाशी टक्कर टाळण्यासाठी एसए20 लीगचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा आता 26 डिसेंबर ते 25 जानेवारी दरम्यान खेळवली जाईल. आता गांगुलीच्या प्रशिक्षणाखाली प्रिटोरिया कॅपिटल्स कशी कामगिरी करते हे पाहणे मनोरंजक असेल.
२०१२ मध्ये सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुलीने विविध प्रशासकीय आणि सल्लागार पदे भूषवली आहेत. 2015 ते 2019 दरम्यान ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यापूर्वी गांगुलीची दिल्ली कॅपिटल्स आयपीएल संघाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
2023 मध्ये ते संघ संचालक म्हणून कॅपिटल्समध्ये परतले. जेएसडब्ल्यू आणि कॅपिटल्स फ्रँचायझीचे सह-मालक जीएमआर ग्रुप यांच्यातील करारानंतर ऑक्टोबर 2024मध्ये गांगुलीची जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.