Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

Damu Naik: दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन्‍ही नवनियुक्त मंत्र्यांना येत्‍या सोमवारी खात्‍यांचे वाटप केले जाणार असल्‍याचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.
Damu Naik
BJP President Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी/पणजी: दिगंबर कामत आणि रमेश तवडकर या दोन्‍ही नवनियुक्त मंत्र्यांना येत्‍या सोमवारी खात्‍यांचे वाटप केले जाणार असल्‍याचे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, आलेक्‍स सिक्‍वेरा यांच्‍याकडे असलेल्‍या सर्व खात्‍यांसह स्‍वत:कडे असलेल्‍या सार्वजनिक बांधकामसह (पीडब्‍ल्‍यूडी) इतर काही खाती दिगंबर कामत यांना, तर गोविंद गावडे यांच्‍याकडील खात्‍यांसह स्‍वत:जवळील आदिवासी कल्‍याण खाते रमेश तवडकर यांना देण्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तूर्तास निश्‍चित केले आहे.

पण, कामत आणि तवडकर हे दोन्‍ही ज्‍येष्‍ठ आमदार असल्‍याने त्‍यांना खाती देण्‍याबाबत मुख्‍यमंत्री पक्षनेतृत्‍वाशी चर्चा करीत असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी गेल्‍या गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्‍यामुळे या दोन्‍ही नेत्‍यांना तत्‍काळ खात्‍यांचे वाटप केले जाईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु, तीन दिवस उलटल्‍यानंतरही त्‍यांना खाती देण्‍यात आली नाहीत.

याबाबत पत्रकारांनी शनिवारी प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांना छेडले असता ते म्‍हणाले, हिंदू धर्मात कुठलेही चांगले काम करण्यापूर्वी पंचांग, तिथी, मुहूर्त पाहिला जातो.

अमावास्येला चांगले काम केले जात नाही. शिवाय कामत आणि तवडकर या दोघांनीही सोमवारी खात्‍यांचे वाटप करावे, अशी मागणी केली होती. त्‍यानुसारच मुख्‍यमंत्र्यांनी दामबाबाचा दिवस म्हणजेच सोमवारी खात्‍यांचे वाटप करण्‍याचे निश्‍चित केले आहे, असे नाईक म्‍हणाले. परंतु, त्‍यांना नेमकी कोणती खाती मिळतील, हे मात्र त्‍यांनी स्पष्ट केले नाही.

Damu Naik
Goa Politics: खरी कुजबुज; कामतांच्या ‘त्या’ व्हिडीओ क्लीप

कामतांना पीडब्ल्यूडी, तवडकरांना क्रीडा?

मंत्रिपदाची शपथ घेतल्‍यानंतर मुख्‍यमंत्री असतानाही अर्थ आणि गृह ही महत्त्‍वाची खाती आपण स्‍वत:कडे ठेवलेली नव्‍हती, असे म्‍हणत दिगंबर कामत यांनी अप्रत्‍यक्षरित्‍या या खात्‍यांवर दावा केला होता. परंतु, मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी ही दोन्‍ही महत्त्‍वाची खाती स्‍वत:कडेच ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे कामत यांना ‘पीडब्‍ल्‍यूडी’, पर्यावरण, कायदा ही खाती मिळू शकतात. तर, मंत्री रमेश तवडकर यांना क्रीडा, आदिवासी कल्याण यांसह एक महत्त्वाचे खाते मिळू शकते, अशी माहिती भाजपच्‍या वरिष्‍ठ सूत्रांनी दिली.

Damu Naik
Goa Politics: खरी कुजबुज; सरकारवर भरोसा नाय बा!

मंत्र्यांच्‍या क्रमवारीतही बदलाची शक्‍यता

कामत आणि तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्‍याने मंत्र्यांच्या क्रमवारीतही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या विश्वजीत राणे हे मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात दिगंबर कामत दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. आताही ते ज्येष्ठ आमदार असल्‍याने क्रमवारीतही बदलाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com