Court Dainik Gomantak
देश

Soumya Vishwanathan Murder Case: टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात 15 वर्षांनंतर न्याय; चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

Soumya Vishwanathan Murder Case: टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी न्यायालयाने चार दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Manish Jadhav

Soumya Vishwanathan Murder Case: दिल्लीतून शनिवारी मोठी बातमी समोर आली आहे. टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्येप्रकरणी न्यायालयाने चार दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या खून प्रकरणातील पाचवा आरोपी लवकरच बाहेर येणार आहे. न्यायालयाने त्याला केवळ 3 वर्षांची शिक्षा ठोठावली असून, आता त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने कारागृहात घालवलेला काळ लक्षात घेऊन त्याची सुटका होणार आहे. तर दिवंगत सौम्याच्या आईने 15 वर्षांनंतर या प्रकरणात न्याय मिळाल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मी न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत आहे, परंतु आनंदी नाही.

हा खून 30 सप्टेंबर 2088 रोजी झाला होता

दरम्यान, दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर 30 सप्टेंबर 2008 रोजी सकाळी ही हत्या करण्यात आली होती. फिर्यादीनुसार, एका इंग्रजी टीव्ही चॅनलमध्ये काम करणारी सौम्या विश्वनाथन रात्री ड्युटीवरुन परतत असताना तिची कार लुटण्यासाठी बदमाशांनी तिचा पाठलाग केला आणि नंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिस तपासादरम्यान, रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी अशी ही घटना घडवून आणणाऱ्या आरोपींची ओळख पटली होती.

चार आरोपी हत्येत आरोपी तर पाचवा...

खटल्याच्या सुमारे एक महिना आधी, 18 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना IPC च्या कलम 302 आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते. याशिवाय, या प्रकरणात आणखी एक आरोपी आहे. अजय सेठी उर्फ ​​चाचावर संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना जाणूनबुजून मदत केल्याचा आरोप होता.

वास्तविक, मारेकरी ज्या कारमधून प्रवास करत होते ती कार अजय सेठी उर्फ चाचाची होती आणि पोलिसांनी ती जप्त केली होती. न्यायालयाने त्यांना अप्रामाणिकपणे मालमत्ता संपादन करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलम 411 अंतर्गत संघटित गुन्ह्याला प्रोत्साहन देणे, जाणूनबुजून मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे, तसेच MCOCA तरतुदी आणि संघटित गुन्हेगारीद्वारे पैसे कमविण्याच्या कट रचल्याबद्दल दोषी ठरवले.

न्यायालयाने शुक्रवारी आपला निर्णय राखून ठेवला होता

दुसरीकडे, या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबाबत शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली असता न्यायालयाने 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. शनिवारी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना दुहेरी जन्मठेपेची तर अजय सेठी उर्फ ​​चाचाला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची शिक्षा पूर्ण झाल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. याशिवाय, दोषींवर 1.25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सौम्याची आई का आनंदी नाही?

दुसरीकडे, न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सौम्याची आई माधवी विश्वनाथन म्हणाल्या, 'आम्ही जे काही भोगले, ते दोषींनाही भोगावे लागले. मी समाधानी आहे, पण आनंदी नाही… कारण माझी मुलगी परत आली तर मला आनंद होईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT