Soumya Murder Case: 15 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा... टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी पाचही आरोपी दोषी

Soumya Murder Case: इंडिया टुडेची महिला पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवले आहे.
Court on Pernem Noise Pollution
Court on Pernem Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Soumya Murder Case: इंडिया टुडेची महिला पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवले आहे. तत्पूर्वी, या खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र कुमार पांडे यांनी 18 ऑक्टोबर रोजी निकाल देताना सर्व आरोपींना (Accused) न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. 6 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेतला होता.

पाच जणांना आरोपी करण्यात आले

दरम्यान, सौम्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 रोजी रात्री उशिरा कारमधून घरी परतत असताना हत्या करण्यात आली होती. त्यादरम्यान तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तिच्या हत्येमागे दरोडा टाकण्याचे कारण असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

या हत्येप्रकरणी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक करण्यात आली होती आणि ते मार्च 2009 पासून कोठडीत होते.

पोलिसांनी (Police) आरोपींना मकोका कायद्यातर्गंत अटक करण्यात आली होती. मलिक आणि इतर दोन आरोपी, रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना 2009 मध्ये आयटी व्यावसायिक जिगिशा घोष यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

Court on Pernem Noise Pollution
Delhi Crime: 'मी या जगासाठी...', सुसाइड नोट लिहून हवाई दलाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा

दुसरीकडे, जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त केल्यानंतर सौम्याच्या खुनाच्या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा पोलिसांनी केला होता. 2017 मध्ये, ट्रायल कोर्टाने जिगीशा घोष खून प्रकरणात कपूर आणि शुक्ला यांना मृत्यूदंड आणि मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मात्र, पुढच्याच वर्षी उच्च न्यायालयाने जिगीशा हत्याकांडातील कपूर आणि शुक्ला यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. मलिकची जन्मठेपेची शिक्षा कायम राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com