Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

Emergency: ''इंदिरा गांधींचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय, तेव्हा सोनिया गांधी...''; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात संविधानाच्या प्रती दाखवल्याबद्दल काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली.

Manish Jadhav

मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी संसदेच्या आवारात संविधानाच्या प्रती दाखवल्याबद्दल काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, '1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सोनिया गांधी पीएम हाऊसमध्ये उपस्थित होत्या.' मध्य प्रदेश भाजपने आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्या लोकांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

दरम्यान, मिश्रा यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना हे वक्तव्य केले. मिश्रा पुढे म्हणाले की, 'ज्या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी सोनिया गांधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. आज त्या आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी संविधानाचे कैवारी झाले आहेत. हा खरा काँग्रेसचा चेहरा आहे.'

मिश्रा पुढे असेही म्हणाले की, 'गेल्या 70 वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात 100 पेक्षा जास्त वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. आता ते खोटे दावे करुन देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. इंडिया आघाडीचे नेते संविधानाचे रक्षण करण्याचा दावा करतायेत. पण सत्य हे आहे की ते सर्वजण आपल्या मुलांच्या राजकीय भवितव्याचे रक्षण करतायेत. ज्यांनी तो काळा दिवस पाहिला नाही, त्यांना आणीबाणीचे सत्य सांगण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला.' 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रती दाखवल्या.

त्यामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली

1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींनी युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव केला होता. मात्र या पराभवानंतर राजनायारण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिरा गांधींवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत खटला दाखल केला होता. यासंदर्भात 12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. त्यामुळे इंदिरा गांधींना पंतप्रधानपद सोडणे अनिवार्य झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT