Uttar Pradesh Election 2022 News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Election 2022: सोनिया गांधी म्हणाल्या...महगाईने जनता त्रस्त'

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतील तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. याच पाश्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Sonia Gandhi Said That People Are Suffering Due To Inflation)

गांधी म्हणाल्या,''देशातील शेतकरी (Farmers) आणि तरुण त्रस्त आहेत. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बेजबाबदारपणे कोरोना परिस्थिती हाताळली. रायबरेलीकडे योगी सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले.''

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पुढे म्हणाल्या, ''तुम्ही ५ वर्षे असे सरकार पाहिले, ज्याने ध्रुवीकरणाशिवाय कोणतेचं काम केले नाही. राज्यात 12 लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत मात्र सरकार ती पदे भरत नाही. पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, तेलाचे भाव इतके वाढले आहेत की, गृहीणींना घर चालवणे देखील कठीण झाले आहे.''

केंद्र आणि यूपी सरकारला घेरले

कोरोना कालावधीचा संदर्भ देताना गांधी म्हणाल्या की, ''लोकांना ऑक्सिजन, बेड आणि औषधांचा तुटवडा सहन करावा लागला. त्या काळात लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. लॉकडाऊनमुळे लोक त्रस्त झाले होते. घरापर्यंत पोहोचण्यासाठी मैलो न मैल पायपीट करावी लागली. परंतु मोदी-योगी सरकारने बेजबाबदारपणे ही परिस्थिती हाताळली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT