Uttar Pradesh: धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत व्यवसायिक गजाआड

उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) आग्रामधून (Agra) लव्ह जिहादचे (Love Jihad) एक धक्कादायक प्रकरणं समोर आले आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) आग्रामधून (Agra) लव्ह जिहादचे (Love Jihad) एक धक्कादायक प्रकरणं समोर आले आहे. आग्रामध्ये राहणाऱ्या निवृत्त आयएएसच्या अधिकाऱ्याच्या मुलीची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी गजाआड टाकले आहे. आरोपी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) येथील रहीवासी आहे. या तरुणाचे नाव आरिफ असून तो धर्मांतर करण्यासाठी धमकावत असल्याचा आरोप केला आहे. पिडित महिलेची लखनऊमधील एका कार्यक्रमामध्ये आरिफ सोबत भेट झाली होती. यानंतर दोघांमधील ओळखीचे प्रमाणही वाढत गेले. पीडीत महिलेचे वडील निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. आरोपी आरिफ (Arif) हा लखनऊमधील ऐशबाग या भागामधील लाकूड व्यवसायिक असल्याची माहिती प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले आहे.

पीडीत महिलेने आरोप केला की, एका कार्यक्रमादरम्यान या तरुणाने माझ्या डोक्यावर कुंकु लावताना फोटो काढला. तोच फोटो दाखवून, त्याने मला बदनाम करण्याची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याची भीती दाखवून माझे शारिरीक शोषण केले. एवढच नाही तर माझी बदनामी करण्याची भीती दाखवून तो वेळोवेळी माझ्याकडून पैसे घेत असे. यावेळेस त्याचे नाव आदित्य नसून आरिफ हाश्मी असल्याचे महिलेला कळवण्यात आले.

Arrested
जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणूका होणार ?

अखेर आरोपीला अटक

आरोपीविरोधात महिलेने प्राणघातक हल्ला, खून करण्याचा प्रयत्न, बलात्कार, अनैतिक कृत्य, दरोडा, फसवणूक, बेकायदेशीर धर्मातंरण आणि बदला घेण्यासारख्या गंभीर कलमांखाली आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रार आल्यानंतर आग्रा पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com