Sonia Gandhi Birthday Dainik Gomantak
देश

Sonia Gandhi Birthday : टिश्यूपेपरवर लव्हलेटर; बाजूला बसण्यासाठी दिले होते पैसे; राजीव-सोनियांची लव्हस्टोरी

सोनिया आणि राजीव गांधी यांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. यानंतरही अनेकवेळा दोघं भेटत राहिले.

आदित्य जोशी

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर सोनिया गांधींसाठी भारत हाच सारंकाही होता. इटलीत राहणाऱ्या सोनिया गांधी भारतात पोहोचल्या. भारतातलं राहणीमान आणि पेहरावही सोनिया गांधी यांनी अंगीकारला. भारतातील भाषा आणि संस्कृती आत्मसात केली. मुख्य म्हणजे कुटुंबाचा आणि काँग्रेसचा वारसा घेऊन त्या राजकारणात पुढे जात राहिल्या. मात्र तुम्हाला माहितीए का सोनिया आणि राजीव गांधी यांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. यानंतरही अनेकवेळा दोघं भेटत राहिले.

दोघेही चांगले मित्र होते आणि त्यांची भेटीतली चर्चा मैत्रीच्या पलीकडे गेली. तोपर्यंत सोनिया गांधींना माहित नव्हते की त्यांचा मित्र भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा आहे. या दोघांची प्रेमकहाणी खरंतर केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजपासून सुरु झाली. 1965 मध्ये 21 वर्षीय राजीव गांधी इंजिनिअरिंगच्या अभ्यास करण्यासाठी केंब्रिजला गेले होते. त्याच वर्षी सोनियाही तिथे पोहोचल्या. जरी दोघांचे कॅम्पस वेगळे होते, तरी यांची प्रेमकहाणी मात्र सुरु झाली होती.

अश्विनी भटनागर यांनी त्यांच्या 'द लोटस इयर्स - पॉलिटिकल लाइफ इन इंडिया इन द टाइम ऑफ राजीव गांधी' या पुस्तकात लिहिलंय की, दोघेही एका कॉमन रेस्टॉरंटमध्ये जात असत. राजीव गांधी सोनिया यांच्या प्रेमात पडू लागले होते. एक दिवस राजीव त्याच ग्रीक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले जिथे सोनिया गांधीही उपस्थित होत्या. राजीव यांनी रेस्टॉरंटचे मालक चार्ल्स अँटोनी यांच्याकडे एक मागणी केली. त्यांनी सोनिया यांना आपल्या शेजारील सीटवर बसवण्यास मालकांना सांगितलं. एक ग्रीक व्यापारी असल्याने चार्ल्सने एकही संधी सोडणे योग्य न वाटल्याने राजीव यांच्याशी थेट करारच केला. या कामासाठी त्याने राजीव गांधी यांच्याकडून दुप्पट पैसे घेतले. राजीव गांधींना सोनिया इतक्या आवडू लागल्या होत्या की पैसे द्यायला वेळ लागला नाही. अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी राजीव गांधींवर बनवलेल्या चित्रपटातही या कथेचा उल्लेख करण्यात आला आहे.

टिश्यू पेपरवर कवितेची गोष्ट

केंब्रिजमध्ये दोघांच्या भेटीचा संदर्भ देत प्रसिद्ध पत्रकार रशीद किडवई सोनिया गांधींच्या चरित्रात लिहितात, सोनिया गांधींची नजर राजीव गांधींवर विद्यापीठाच्या रेस्टॉरंटमध्ये गेली, जिथे विद्यार्थी जमायचे. दोघांमध्ये एकमेकांबद्दलचे आकर्षण तसं पाहायला गेल्यास एकसमान होतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण राजीव यांनी त्यांच्या मनातील गोष्ट सोनियांपर्यंत पोहोचवण्यासाठी टिश्यू पेपरचा आधार घेतला होता. टिश्यूवर कविता लिहून एका वेटरमार्फत राजीव यांनी ती सोनियांकडे पाठवली होती.

कविता वाचून सोनिया अस्वस्थ झाल्या, पण दोघांना एकत्र आणण्याचे काम एका जर्मन मित्राने केले. त्यांनी दोघांसाठी संदेशवाहकाची भूमिका त्याने चांगली वठवली. त्यामुळे दोघांमधील अंतर कमी होत गेले आणि त्यांचे प्रेम वाढत गेले.

राजीव गांधी यांच्या प्रेमात पडल्यानंतरही सोनिया गांधी त्यांच्या कुटुंबाबाबत अनभिज्ञ होत्या. तसेच राजीव यांनीही सोनिया यांना आपल्या कुटुंबाबाबत काही सांगितले नव्हते. एक दिवस तिथल्या वृत्तपत्रात इंदिरा गांधींचे चित्र प्रसिद्ध झाले. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा त्यांच्या आईचा फोटो आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT