Court Decision  Dainik Gomantak
देश

आईचा खून करुन मृतदेहाचे 16 तुकडे केले, उलट्या काळजाच्या मुलाला कोर्टाने ठोठावली जन्मठेप

mother murder case: जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. मोहम्मद मोईद्दुन यांनी हा निवाडा दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आसाम: आईचा खून करणाऱ्या मुलाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. २०२२ मध्ये आसाममध्ये घडलेल्या या घटनेचा खटला सोनितपूर जिल्ह्यातील फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात आला होता. मुलाने आईचा खून करुन मृतदेहाचे १६ तुकडे केले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आईचा खून केल्याप्रकरणी मुलगा मदहाब ब्रम्हा या फास्ट ट्रॅक कोर्टाने दोषी ठरवले आहे. कोर्टाने ब्रम्हाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. मोहम्मद मोईद्दुन यांनी हा निवाडा दिला आहे.

रागाच्या भरात दोषी ब्रम्हा याने फावड्याने आईचा खून केला होता. सप्टेंबर २०२२ साली या घटनेने सोनितपूर जिल्हा हादरुन गेला होता. मुलाने खून केल्यानंतर आईच्या मृतदेहाचे १६  तुकडे केले होते. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक करुन त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

खून केल्यानंतर मुलाने गुन्हा लपविण्यासाठी अनेक शक्कल लढविल्या होत्या पण, पोलिसांनी आरोपीला यशस्वीरित्या अटक करुन कोर्टासमोर हजर केले होते. पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी तपास करुन कोर्टासमोर सक्षमपणे बाजू मांडली होती.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात आला होता. कोर्टाने याप्रकरणी निवाडा देत दोषी मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT