उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका विलक्षण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रस्त्यावर थेट नाग आणि मुंगूस यांच्यात झालेली जीवघेणी झुंज पाहायला मिळते. जंगलात किंवा डोंगराळ भागात अशा प्रकारचे संघर्ष पाहायला मिळणं सामान्य असलं तरी, थेट रस्त्यावर आणि लोकांच्या नजरेसमोर झालेला हा संघर्ष सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला, काळा कोब्रा रस्त्याच्या कडेला झुडपाजवळ फणा काढून उभा असलेला दिसतो. त्याच्या या धोकादायक थाटामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबते आणि आसपासचे लोकही बघ्यांची भूमिका घेतात. कोब्रा पूर्ण ताकदीने फणा काढून उभा असतो.
काही क्षणांनी, झुडपांमधून अचानक एक मुंगूस वेगाने बाहेर येतं आणि थेट कोब्राच्या दिशेने सरकतो. कोब्रा आणि मुंगूस यांच्यातील जुनी शत्रुत्वाची कहाणी सर्वश्रुत आहे. पण यावेळी त्यांचं शत्रुत्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा अनुभव लोकांना मिळाला.
कोब्राने दोनदा मुंगूसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण मुंगूस अधिक वेगाने प्रतिसाद देत असतो. काही क्षणांमध्येच मुंगूस कोब्राला तोंडाने पकडतो आणि थेट झुडपांकडे फरफटत नेतो. ही लढाई अवघ्या काही सेकंदात संपते. संपूर्ण व्हिडिओ फक्त ५० सेकंदांचा असला तरी, यातील रोमांच प्रेक्षकांना थक्क करणारा आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (माजी ट्विटर) वर शेअर करण्यात आला असून त्यास लाखो व्ह्यूज आणि शेकडो शेअर्स मिळाले आहेत. पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय, "रस्त्यावर काळ्या कोब्रा आणि मुंगूस यांच्यातील संघर्ष पाहून वाहतूक थांबली." या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या हा थरारक संघर्ष सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कोब्रा आणि मुंगूस यांच्यातील ही अजब भेट अनेकांनी मोठ्या उत्सुकतेने पाहिली असून, जंगलातील नैसर्गिक शत्रुत्वाचा हा प्रत्यक्ष साक्षात्कार लोकांना थक्क करणारा ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.