Goa University: विद्यापीठात आनंदोत्सव! सर्वांच्या कष्टामुळेच A+; कुलसचिव धुरींचे प्रतिपादन

Goa University Naac A Plus: विद्यापीठाला मिळालेल्या श्रेणीबाबत धुरी यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच हा मान मिळाला आहे.
Goa University
Goa University Naac A PlusDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विद्यापीठाला ‘बी प्लस प्लस’ श्रेणी होती, त्यामुळे विद्यापीठाला २०२२ मध्ये आम्हाला रिअसायन्मेंटला जाण्याची संधी मिळाली, त्यानुसार तीन वर्षांत ‘नॅक’ला आवश्यक त्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या. तीन वर्षांत विद्यापीठातील सर्व घटकांनी भरपूर कष्ट घेतले, त्यामुळेच ही ‘ए प्लस’ श्रेणी मिळाल्याची प्रतिक्रिया कुलसचिव एस. एन. धुरी यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

विद्यापीठाला मिळालेल्या श्रेणीबाबत धुरी यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच हा मान मिळाला आहे. काही विभागांमध्ये अद्ययावत सुविधा दिसून येतील. डॉक्युमेंट, फॅसिलिटी उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. रिअसायन्मेंटचा अहवाल जानेवारीमध्ये ‘नॅक’ला सादर केला होता.

त्यानंतर एसएसआर (सेल्फ स्टडी रिपोर्ट) एप्रिल २०२५ मध्ये सादर केला. त्यानंतर ‘नॅक’ या अहवालाची तपासणी करते आणि डेटा व्हेरिफिकेशनमध्ये ७० टक्के गुण देते आणि निरीक्षणात ३० गुण दिले जातात. ‘नॅक’ नव्या नियमानुसार काम करीत असून पूर्वीची प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे मागील ‘बॅकलॉक’ पूर्ण करावा लागत आहे.

मागील तीन महिने दिवस-रात्र ही श्रेणी मिळविण्यासाठी काम केले. विद्यापीठात २५० च्यावर ‘फॅकल्टी’ आहेत. पुढील पाच वर्षांसाठी ही श्रेणी कायम राहणार आहे. रिसर्च फंडिग व इतर विविध निधी विद्यापीठाला मिळू शकतो, त्याशिवाय या श्रेणीमुळे परराज्यातील आणि परदेशातील विद्यार्थीही गोव्यात शिकण्यासाठी येऊ शकतात, अशी आशाही धुरी यांनी व्यक्त केली.

Goa University
Goa University: गोवा विद्यापीठात 3 मल्याळींना कार्यकारी मंडळावर नेमण्याची आवश्‍यकता काय? चौकशी समितीचा सवाल

नॅकचे सात निकष

अभ्यासक्रम

शिक्षणाची पद्धती

वर्गांची रचना

रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन

पायाभूत सुविधा आणि विद्यार्थी प्रोत्साहन

गव्हर्नन्स लिडरशीप

एक्स्टेन्शन ॲक्टिव्हिटीज

Goa University
Goa University: गोवा विद्यापीठाला NAAC कडून A+ ग्रेड! इतिहासात पहिल्यांदाच मिळाला हा मान, CM सावंतांनी केलं अभिनंदन

विद्यापीठात आनंदोत्सव

विद्यापीठाला ‘ए प्लस’ श्रेणी मिळाल्याने आज कुलगुरू हरिलाल मेनन यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी केमस्ट्री फॅकल्टीच्या सभागृहात आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सर्व घटकांनी केलेले सहकार्य आणि घेतलेल्या परीश्रमामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी व्यासपीठावरून सांगितले.

यावेळी काही प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर या आनंदोत्सवात कुलगुरूंनी विद्यार्थ्यांसह अल्पोपहार घेत शुभेच्छाही स्वीकारल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com