Smriti Mandhana Body shaming Dainik Gomantak
देश

Smriti Mandhana Body shaming: बॉडी शेमिंगची शिकार झाली स्मृती मानधना, सलमान खानच्या 'त्या' लूकशी तुलना

Smriti Mandhana Body shaming News: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आहे.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात तिच्या लूकवरून सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. एका खेळाडूच्या शरीरयष्टीवरून तिला हिणवणे आणि तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्याशी करणे, यावरून इंटरनेटवर आता नवा वाद पेटला आहे.

लग्न रद्द झाल्याच्या धक्क्यातून सावरतेय स्मृती

स्मृती मानधना आणि तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मात्र, ऐनवेळी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने हे लग्न थांबवावे लागले. त्यानंतर काही दिवसांतच या दोघांनी आपले नाते संपवत असल्याचे जाहीर केले.

या वैयक्तिक धक्क्यातून सावरत स्मृती आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर लक्ष केंद्रित करत आहे. पुनरागमन करण्यापूर्वी तिने काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती, जिथे तिला चाहत्यांच्या प्रेमासोबतच ट्रोलर्सच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला.

पांढऱ्या गाऊनमधील लूक

एका प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी स्मृतीने पांढऱ्या रंगाचा 'फ्लोर-लेंथ गाऊन' परिधान केला होता. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही जणांनी तिचे कौतुक केले, तर अनेकांनी तिच्या फिटनेसवर आणि शरीरावर आक्षेपार्ह कमेंट्स केल्या. एक ॲथलीट असूनही तिला 'बॉडी शेमिंग'चा (शरीरावरून हिणवणे) सामना करावा लागला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

सलमान खानच्या 'त्या' लूकशी केली तुलना

ट्रोलर्सनी मर्यादा ओलांडत स्मृतीच्या लूकची तुलना 'जान-ए-मन' चित्रपटातील सलमान खानच्या गेटअपशी केली. चित्रपटात सलमानने एका प्रसंगात परिधान केलेल्या कपड्यांशी स्मृतीच्या गाऊनची तुलना करून तिची थट्टा उडवण्यात आली.

मैदानावर देशासाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूची अशा प्रकारे तुलना केल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. खेळाडूची खरी ताकद ही त्याची फिटनेस आणि खेळातील कामगिरी असते, केवळ दिसण्यावरून तिला जज करणे चुकीचे असल्याचे मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT