Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

Leopard In Goa: शिरोडवाडी–मुळगाव येथे घरी जात असताना निवृत्त बँक अधिकारी दिगंबर नाईक यांच्या स्कुटरला बिबट्याने अचानक धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली.
Leopard Goa
LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शिरोडवाडी–मुळगाव येथे घरी जात असताना निवृत्त बँक अधिकारी दिगंबर नाईक यांच्या स्कुटरला बिबट्याने अचानक धडक दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. बिबटा अचानक धावत आल्याने नाईक स्कुटरवरून खाली पडले व जखमी झाले.

सुदैवाने, या घटनेत मोठा अनर्थ टळला. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा ताबतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leopard Goa
Leopard Cub Rescued: आधी वाटले कुत्र्याचे पिल्लू, नंतर निघाला बिबट्याचा बछडा; खांडेपार येथील घटना, Watch Video

शनिवारी रात्री दिगंबर नाईक हे डिचोलीहून स्कुटरवरून मुळगाव येथील घरी परतत होते. डिचोली–अस्नोडा मुख्य रस्त्यावरील शिरोडवाडी–मुळगाव परिसरात पोहोचताच उजव्या बाजूने एक बिबटा वेगाने धावत आला आणि त्यांच्या स्कुटरला आपटला. धडकेमुळे नाईक रस्त्यावर कोसळले. स्थानिकांनी तातडीने त्यांना डिचोली आरोग्य केंद्रात दाखल केले.

Leopard Goa
Leopard In Goa: डिचोलीत नेमके किती 'बिबटे' फिरताहेत? 2 पकडून नेले, तिसऱ्याच्या वावराच्या खाणाखुणा; स्थानिक भयभीत

अधूनमधून बिबट्याचे दर्शन

मुळगाव येथे रात्रंदिवस सुरू असलेल्या खनिज व्यवसायामुळे बिबटे लोकवस्तीत शिरकाव करत असल्याचा दावा मुळगावचे माजी सरपंच वसंत गाड यांनी केला आहे. वन खात्याने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी मुळगाव येथे भर लोकवस्तीत एक बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले होते. त्यानंतर अधूनमधून बिबट्यांचे दर्शन घडत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुळगाव येथे भर लोकवस्तीत बिबट्यांचा संचार वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com