Goa Crime: ‘ते’ तोतया पोलिस महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज! CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; मराठीत बोलत असल्याचे उघड

Bicholim Mangalsutra Theft: शनिवारी महिलेला लुबाडण्याची घटना आणि नऊ महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे.
CCTV
CCTVDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीत महिलेला लुबाडणारे ‘ते’ तोतया पोलिस महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. ज्या महिलेचे मंगळसूत्र पळवले तिने हे भामटे शुद्ध मराठीत बोलत असल्याचे पोलिसांना सांगितले.

शनिवारी महिलेला लुबाडण्याची घटना आणि नऊ महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेमध्ये साम्य असल्याचे दिसून येत आहे. पोलिस असल्याची बतावणी करुन भर दुपारी दोघा भामट्यांनी माधवी नाईक या महिलेचे मंगळसूत्र पळविले होते.

मंगळसूत्र कागदात गुंडाळल्याचे दाखवत या भामट्यांनी दगडाची पुडी तिच्या हातावर ठेवली होती. मोटारसायकलीवरुन आलेल्या या तोतया पोलिसांनी माधवी हिचे मंगळसूत्र हाती लागताच मोटारसायकलवरून पलायन केल्याचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.

CCTV
Goa Crime: पोलिस बोलावताहेत म्हणून गेली, तोतयांनी पळवले 6 लाखांचे मंगळसूत्र; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे डिचोलीत गोंधळ

एकाने हेल्मेट (शिरस्त्राण) परिधान केले तर दुसऱ्याने तोंडाला स्कार्फ बांधला होता. त्यामुळे दोघांचेही चेहरे ओळखणे कठीण बनले आहे.

CCTV
Goa Theft: गोव्यातील हॉस्पिटलमध्ये केली चोरी, मुंबईला गेला पळून; लोकेशन ट्रेस झाल्यामुळे सराईत चोरटा जेरबंद

५ मार्च रोजी अशीच घटना

नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच ५ मार्च रोजी तोतया पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ सुरेश फळारी या वयोवृद्ध दुकानदाराला दिवसाढवळ्या लुबाडले होते. पोलिस असल्याचा बनाव करुन या भामट्यांनी सुरेश फळारी यांच्या गळ्यातील ६ लाख रुपये किमतीची सोनसाखळी घेवून पळ काढला होता.

सोनसाखळी लुबाडताना या भामट्यांनी फळारी यांच्या हाती दगड ठेवले होते. सुरेश फळारी यांना लुबाडणारे हे भामटे मोटारसायकलवरून पळतानाचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. मात्र, ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. गेल्या दहा महिन्यांच्या आत डिचोलीत घडलेल्या लुटण्याच्या घटनांची पार्श्वभूमी पाहता डिचोलीत ''तोतया'' पोलिस वावरत असावेत, असा संशय वर्तविण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com