Smriti Irani Dainik Gomantak
देश

Karnataka Election 2023: 'मी स्वतः प्रियंका गांधी यांना नमाज...', स्मृती इराणी यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Smriti Irani Statement: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जातीय रंगाबरोबर, धार्मिक रंग देण्यास राजकीय नेत्यांनी सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जातीय रंगाबरोबर, धार्मिक रंग देण्यास राजकीय नेत्यांनी सुरुवात केली आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.

यातच, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या आश्वासनावरुन राजकीय गोंधळ सुरु आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. इराणी म्हणाल्या की, 'मी स्वतः प्रियंका गांधी वाड्रा यांना अमेठीमध्ये नमाज अदा करताना पाहिले आहे. तुम्हाला हवे असल्यास इस्लाममधील धर्मगुरुंना विचारा, जे नमाज अदा करतात ते मूर्तीपूजा करत नाहीत. आणि कदाचित त्यामुळेच त्यांचा राममंदिराला विरोध आहे.'

स्मृती इराणी यांच्या या वक्तव्यामुळे बजरंग दलावरील वादानंतर प्रियंका यांच्या प्रार्थनेवरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्मृती इराणी यांचे मोठे वक्तव्य

स्मृती इराणी म्हणाल्या की, 'सर्वप्रथम काँग्रेसने (Congress) हिंदू संघटनेची तुलना दहशतवादी संघटनेशी केली आहे. पीएफआय ही ती संघटना आहे, जी देशाला नष्ट करण्यासाठी दहशतवादी कारवायांमध्ये लोकांना सामील करण्याचे धाडस करत होती.

पीएफआय ही अशी संघटना आहे, जी दहशतीच्या माध्यमातून हिंदूंना नष्ट करण्याची व्यवस्थाही करत होती. तुम्ही अशा दहशतवादी संघटनेची तुलना अशा हिंदू समाजाशी आणि हिंदू संघटनेशी करता, ज्यांनी आयुष्यभर समाजाच्या रक्षणासाठी काम केले.'

काँग्रेसला हिंदूविरोधी असल्याचे सांगितले

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, 'काँग्रेस पक्ष हिंदूविरोधी आहे, हे आम्हाला माहीत होते, पण आता त्यांनी जाहीरनाम्यातही याचा पुरावा द्यायला सुरुवात केल्याचे आम्ही पाहिले आहे.

बजरंग बलीचे नाव घेतल्यावर ज्यांना राग येतो, त्यांना हिंदू धर्म मानणाऱ्यांचा किती राग येत असेल याची कल्पना करा. त्याचाच हा पुरावा आहे. निवडणूक आयोगात रामभक्तांविरोधात फक्त काँग्रेस पक्षच बोलू शकतो. अन्यथा तो श्रद्धेचा विषय आहे.'

गांधी कुटुंबावर निशाणा साधला

हनुमानाचे मंदिर बांधण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर स्मृती इराणी म्हणाल्या की, 'मी स्वतः काँग्रेस नेतृत्वाला अमेठीत नमाज अदा करताना पाहिलं आहे.

इस्लाममध्ये विशेष स्वारस्य किंवा श्रद्धा असलेले लोक मूर्तिपूजक असू शकत नाहीत. कदाचित त्यामुळेच गांधी घराण्याचा राम मंदिराला विरोध राहिला.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT