Pahalgam Terrorist Attack
जम्मू काश्मीर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटक आणि काही स्थानिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर तिन्ही लष्करी सेना अलर्ट मोडवर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उच्चस्तरीय बैठका घेत आहेत. दरम्यान, या हल्ल्यातील सहभागी दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत.
लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काश्मीरमधील पहलगाम मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवारी याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले असता, काही दहशतवाद्यांनी पर्यटकांना निशाना करत गोळीबार केला. या २६ पर्यटक आणि स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना नाव विचारुन त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत.
या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे स्केच (फोटो) आता समाजमाध्यामांवरुन समोर येऊ लागले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबु तल्हा अशी या तिघांची नावे असल्याचे समोर आले आहे. तिघेही लष्कर ए तैयबाशी निगडीत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा सध्या या दहशतवाद्यांच्या शोधात आहेत.
हल्ल्याची घटनासमोर आल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी तत्काळ काश्मीरला जात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह परिस्थितीचा आढावा घेतला. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दौऱ्या अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी घटनेचा निषेध करत दोषींना सोडणार नाही, असा इशारा दिला.
गृहमंत्री अमित शहांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांनी नाव विचारुन एकावर गोळ्या झाडल्याचे एक महिला समोर आलेल्या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी विमानभाडे कमी करण्याची विनंती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने केली आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबई यासारख्या महत्वाच्या शहरांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.