Pahalgam: दहशतवादाविरोधात लढण्यासाठी नेहमीच भारताला सहकार्य असेल; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा संदेश

Pahalgam Terrorist Attack: दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पंतप्रधान मोदी आणि भारतातील अतुलनीय जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आणि मनापासून सहानुभूती आहे
Pahalgam Terrorist Attack
Vladimir PutinDainik Gomantak
Published on
Updated on

Pahalgam Terrorist Attack

जम्मू काश्मीर: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात नौदल अधिकाऱ्यासह देशी आणि विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, उच्च स्तरीय बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, रशियाने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावाने संदेश दिला आहे.

"सामान्य नागरिक आणि परदेशी नागरिकांचा बळी गेलेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मनापासून शोक व्यक्त करतो. या क्रूर गुन्ह्याला कोणतेही समर्थन नाही. यातील दहशतवाद्यांना योग्य शिक्षा दिली जाईल, अशी आम्ही अपेक्षा करतो. दहशतवादाशी लढा देण्यासाठी भारतीयांना सहकार्य वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. मृतांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांना आमची प्रामाणिक सहानुभूती कळवा, तसेच सर्व जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा," असा संदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.

Pahalgam Terrorist Attack
Pahalgam Terrorist Attack: दोषींना सोडणार नाही...,पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी PM मोदींची तंबी; 'या' संघटनेनी स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

"काश्मीरमधून अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी मिळाली. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. दगावलेल्या आत्म्यासाठी आणि जखमींच्या प्रकृतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतातील अतुलनीय जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आणि मनापासून सहानुभूती आहे", अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

Pahalgam Terrorist Attack
Mumbai-Goa Flight: आता जीवाचा गोवा 'इंडिगो' संग! विमान तिकीट ट्रेनपेक्षाही झालं स्वस्त

नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने देखील जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "आम्ही भारत सरकार आणि लोकांप्रती, विशेषत: या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करतो", अशी प्रतिक्रिया इराणच्या दूतावासाने दिली आहे.

या घटनेनंतर पहलगाममध्ये नागरिकांना रस्त्यावर उतरत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. नागरिकांनी हातात मेणबत्ती घेऊन मोर्चा काढला व न्यायाची मागणी केली. तसेच, दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीसह विविध भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com