Single Woman Dainik Gomantak
देश

सिंगल महिला, सिंगल पुरुषांपेक्षा जास्त समाधानी; अभ्यासातून माहिती समोर

Social Psychological and Personality Science: सिंगल महिला एकाकी किंवा अतृप्त असतात तर पुरुष डिझायरेबल (इष्ट) असतात, असे चित्र रंगवले जाते. दरम्यान, स्त्रिया पुरुषांपेक्षा आरोग्याच्याबाबत उजव्या ठरतात.

Pramod Yadav

सिंगल महिला अधिक समाधानी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सिंगल पुरुषांच्या तुलनेत अविवाहित स्त्रिया नातेसंबंध, लैंगिक अनुभव आणि रोमँटिक जोडीदारासाठी कमी इच्छा व्यक्त करतात, असे या अभ्यासात आढळले आहे. नुकताच हा अभ्यास सोशल सायकोलॉजिकल अँड पर्सनॅलिटी सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे.

समाजात वाढत असलेल्या सिंगलहूडचे प्रमाण आणि ट्रेंड लक्षात घेता संशोधकांनी हा अभ्यास हाती घेतला होता. रिलेशनशिपमध्ये असणारे, नात्यात अंतर आलेल्या आणि सिंगल असलेल्यांचे स्वास्थ यावर हा अभ्यास बेतलेला होता.

तसेच, समाजातील रुढ मान्यता जसे की, सिंगल महिला एकाकी किंवा अतृप्त असतात तर पुरुष डिझायरेबल (इष्ट) असतात, असे चित्र रंगवले जाते. दरम्यान, स्त्रिया पुरुषांपेक्षा आरोग्याच्याबाबत उजव्या ठरतात.

संशोधकांनी 2020 ते 2023 या काळात केलेल्या 10 विविध अभ्यासांमधून डेटा एकत्र केला. या अभ्यासांमध्ये एकत्रितपणे 5,941 जणांनी सहभाग घेतला होता. डेटा संकलनाच्या वेळी कोणीच रोमँटिक संबंधात नव्हते. यामध्ये 18 ते 75 वयोगटातील नागरिकांचे पुरुष आणि महिलांमध्ये समान विभाजन करण्यात आले होते. याचे सरासरी वय 31.7 एवढे होते.

अभ्यासात सहभागींनी त्यांच्या सध्याच्या नातेसंबंधाची स्थिती, जीवनातील समाधान, लैंगिक समाधान आणि रोमँटिक जोडीदाराची इच्छा याविषयी त्यांचे समाधान दर्शवणारी प्रश्नावली देण्यात आली होती. सहभागींनी प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर संपूर्ण डेटाचे सांख्यिकीय मॉडेल वापरून विश्लेषण करण्यात आले.

काय आढळले अभ्यासात?

या अभ्यासातून अविवाहित स्त्रिया, नातेसंबंध, जीवनातील समाधान, लैंगिक समाधान आणि रोमँटिक जोडीदाराची कमी इच्छा याबाबत जास्त समाधानी असल्याचे आढळून आले. एकूणच, यातून सिंगल स्त्रिया सिंगल पुरुषांपेक्षा एकटेपणात अधिक आनंदी असतात, असे आढळून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT