Lawrence Bishnoi  Dainik Gomantak
देश

Lawrence Bishnoi विरुद्ध NIA ची मोठी कारवाई, UAPA अंतर्गत नोंदवला गुन्हा

NIA: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध मोठी कारवाई करत NIA ने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Lawrence Bishnoi Arrested: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध मोठी कारवाई करत NIA ने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर लॉरेन्स बिश्नोईचे दहशतवादाशीही संबंध जोडले जात होते. अनेक प्रकारचे इनपुट बाहेर येत होते. याच प्रकरणात एनआयएने त्याच्यावर ही कारवाई केली आहे. एजन्सीने त्याला भटिंडा कारागृहातून अटक केली आहे.

लॉरेन्स हा मुसेवाला हत्याकांडातील आरोपी

सहा महिन्यांपूर्वी 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची मानसा येथील एका गावात भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सुमारे 10 मिनिटे गोळीबार सुरु होता, ज्यामध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुमारे 30 राऊंड गोळीबार केला. हल्ल्यानंतर 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले.

दुसरीकडे, एनआयएपूर्वी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लॉरेन्स बिश्नोईविरुद्ध यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अनेक प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या बिश्नोईवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मूसेवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि विक्रम ब्रार उर्फ ​​बुद्ध यांच्या विरोधात यूएपीएचे हत्यार सरकारने उपसले आहे.

एनआयएने दोन पंजाबी गायकांची चौकशी केली

NIA सूत्रांनी सांगितले की, 'आम्ही या वर्षी मे महिन्यात लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी दोन पंजाबी गायकांची चौकशी केली.' एनआयएने दिल्ली मुख्यालयात दिलप्रीत ढिल्लो आणि मनकिरत औलख यांची चौकशी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT