Lawrence Bishnoi Viral Video: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिस का देतायेत शब्बासकी?

Punjab Police: लॉरेन्स बिश्नोईच्या हजेरीने पंजाब पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आले.
Lawrence Bishnoi
Lawrence BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

Lawrence Bishnoi Viral Video: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप असलेला आणि तुरुंगवास भोगत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला पंजाबमधील मोगा न्यायालयात हजर करण्यात आले. लॉरेन्स बिश्नोईच्या हजेरीने पंजाब पोलीस चौकशीच्या फेऱ्यात आले आहे. खरं तर, लॉरेन्स बिश्नोईला खटल्यासाठी नेत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक प्रश्न विचारत आहेत की, इन्स्पेक्टर लॉरेन्स बिश्नोईचे अभिनंदन का करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस लॉरेन्स बिश्नोईला मोगा कोर्टात घेऊन जाताना दिसत आहेत.

या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची हजेरी

लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) बंबिहा गॅंगच्या हरजित सिंग पेंटा हत्या प्रकरणात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईची अटक, चौकशी आणि ट्रान्झिट रिमांडची मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने (Court) त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Lawrence Bishnoi
Salman Khanला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीने बनवला 'प्लॅन बी'

या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईची हजेरी

लॉरेन्स बिश्नोईला बंबिहा गॅंगच्या हरजित सिंग पंता हत्या प्रकरणात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी (Police) लॉरेन्स बिश्नोईची अटक, चौकशी आणि ट्रान्झिट रिमांडची मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दुसरीकडे, मोगा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, हरप्रीत सिंग पेंटाची 2 एप्रिल 2022 रोजी हत्या करण्यात आली होती, ज्याचा गुन्हा बाघापुराना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात नांगलोईच्या रुपांजलीचे नावही समोर आले असून, तिने फेसबुकवर पोस्ट टाकून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या अनेक गुन्ह्यांची जबाबदारीही घेतली होती. अटकेनंतर चौकशीदरम्यान रुपांजलीने खुलासा केला होता की, मी फेसबुकच्या माध्यमातून बिश्नोईच्या संपर्कात आले होते, आणि त्याच्या सूचनेनुसार 'गोल्डी ब्रार' नावाने बिश्नोईचे पेजही तयार केले होते.

Lawrence Bishnoi
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई 'मास्टरमाईंड'

मुसेवाला खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव आहे

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब (Punjab) पोलिसांनी मानसा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या गुन्ह्याचा मास्टरमाइंड म्हणून लॉरेन्स बिश्नोईचे नाव आहे. युवा अकाली दलाचा नेता विकी मिड्दुखेडाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 30 मे रोजी झालेल्या गुन्ह्यात 1,850 पानांच्या आरोपपत्रात 36 शूटर, मास्टरमाइंड आणि इतरांची नावे आहेत.

Lawrence Bishnoi
सलमानसोबतच बॉलिवूडमधील आणखी एक मोठे नाव होते बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर

तसेच, बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया याच्याशिवाय मनमोहन मोहना, दीपक टिनू, संदीप केकरा, अंकित सिरसा, प्रियव्रत फौजी, सचिन भिवानी, केशव, कशिश, मनप्रीत मनू आणि जगरुप रुपा यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे. कॅनडातील बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रारचे नाव आरोपपत्रात आहे. खुनाची जबाबदारी त्याने आधीच घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com