Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोईचं दहशतवादी कनेक्शन, तपासात मोठा खुलासा

Delhi Police: तेथून तो त्याची टोळी चालवण्यासाठी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 9643XXXXXX चा वापर करत होता.
Sachin Bishnoi
Sachin BishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

Tihar Jail: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचे मोबाईल वापरत असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. तपासात दिसून आले की, लॉरेन्स बिश्नोईला तिहारच्या तुरुंग क्रमांक 8 मध्ये ठेवण्यात आला होते. तेथून तो त्याची टोळी चालवण्यासाठी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 9643XXXXXX या नंबरचा वापर करत होता. यावर्षी मार्चमध्ये तपास यंत्रणांनी हा नंबर इंटरसेप्ट केला.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलला त्यांच्या माहितीची पुष्टी करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई, संपत नेहरा, बिंटू उर्फ ​​मिंटू आणि दीपक उर्फ ​​टिनू यांच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आवाजाच्या नमुन्याच्या तपासणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

Sachin Bishnoi
Filmfare Awards Video: सिद्धू मूसेवालाच्या गाण्यावर थिरकले रणवीर अन् विकी कौशल

बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात

लॉरेन्स बिश्नोई, संपत नेहरा यांच्यासह 20 गुंडांवर UAPA अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी सध्या लॉरेन्स बिश्नोई पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. सिद्धू मूसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शुभदीप सिंग सिद्धू याची 29 मे रोजी पंजाबमधील (Punjab) मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने मूसेवाला आणि 423 लोकांची सुरक्षा कमी केली होती.

Sachin Bishnoi
'सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणात राजकारण आणू नका', सुप्रीम कोर्टाचा सल्ला

तसेच, पंजाब पोलिसांचे (Police) एडीजीपी प्रमोद बन यांनी 23 जून रोजी दावा केला होता की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे कबूल केले आहे. गेल्या ऑगस्टपासून यासंबंधीची योजना तो आखत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com