Shubman Gill Dainik Gomantak
देश

IND vs ENG: रेकॉर्डब्रेकर गिल! मँचेस्टरमध्ये शुभमन करणार मोठा धमाका; 19 वर्ष जुना रेकॉर्ड निशाण्यावर

Shubman Gill Record: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.

Manish Jadhav

Shubman Gill Record: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने या मालिकेत एक द्विशतकही झळकावले आहे. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले असून त्यात इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल 19 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडू शकतो. हा विक्रम 2006 मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने (Mohammad Yousuf) बनवला होता आणि आता गिलला हा विक्रम मोडण्यासाठी केवळ 25 धावांची गरज आहे.

मँचेस्टर कसोटीत गिल इतिहास रचू शकतो!

शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या (England) या कसोटी मालिकेत तीन सामन्यांमध्ये 101.17 च्या सरासरीने 607 धावा केल्या आहेत. यात एक द्विशतक आणि दोन शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गिल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

आतापर्यंत इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत 600 पेक्षा जास्त धावा करणारे केवळ तीनच आशियाई खेळाडू आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहेत, ज्यांनी 2002 मध्ये 4 सामन्यांत 602 धावा केल्या होत्या. शुभमनने त्यांना मागे टाकून यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत अव्वल स्थानी पाकिस्तानचा मोहम्मद युसूफ आहे, ज्याने 2006 मध्ये 4 सामन्यांत 90.14 च्या सरासरीने 631 धावा केल्या होत्या. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 202 धावा होता. जर शुभमन गिलने मँचेस्टर कसोटीत आणखी 25 धावा केल्या, तर तो मोहम्मद युसूफचा विक्रम मोडेल आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनेल.

कर्णधार आणि फलंदाज म्हणून गिलची दुहेरी जबाबदारी

टीम इंडियासाठी मँचेस्टर कसोटी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या सामन्यात गिलची नजर मोठी धावसंख्या करण्यावर असेल. भारतीय कसोटी कर्णधाराला मँचेस्टरमध्ये कर्णधारपदासोबतच फलंदाजीमध्येही धमाकेदार कामगिरी करावी लागेल. कारण, जर टीम इंडिया मँचेस्टर कसोटी हरली, तर त्यांना मालिका जिंकण्याची संधी मिळणार नाही.

लॉर्ड्स कसोटीतील चुका विसरुन पुढे जावे लागेल

लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 193 धावांची गरज होती, पण संघ 170 धावांवरच गारद झाला आणि इंग्लंडने 22 धावांनी हा सामना जिंकला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, पण दुसऱ्या डावात त्यांची कामगिरी निराशाजनक होती. लॉर्ड्स कसोटीत जे काही घडले, ते टीम इंडियाला पूर्णपणे विसरुन मँचेस्टर कसोटीवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT