Shraddha Walkar Murder Case Dainik Gomantak
देश

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमन्तक

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यासोबतच आरोपी आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी तपासादरम्यान पोलिसांनी जंगलातून जप्त केलेले केस आणि हाडांच्या डीएनए चाचणीचा अहवाल आला होता. या अहवालाने पुष्टी केली की, सापडलेले केस आणि हाडे मृत श्रद्धाचे आहेत.

चौकशीत तिची हत्या करुन 35 तुकडे केल्याचे सांगण्यात आले

आफताबने चौकशीदरम्यान 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्याचा खुलासा केला होता. दोघेही मुंबईत (Mumbai) राहत होते. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता, मात्र दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. आफताबने अनेकदा तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

दरम्यान, मुंबईनंतर ते दोघेही दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत (Delhi) दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितले होते की, 18 मे रोजी त्याचे श्रद्धासोबत भांडण झाले होते. यानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने श्रद्धाचे 35 तुकडे केले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे.

12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली

12 नोव्हेंबर रोजी श्रद्धा हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याने श्रद्धाच्या मृत्यूनंतरही तिच्या सोशल मीडियाचा वापर केला होता. तसेच श्रद्धाच्या खात्यातून पैसेही ट्रान्सफर केले होते. येथूनच पोलिस आफताबपर्यंत पोहोचले, कारण पोलिसांना या आकाऊंट्सबाबत माहित पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT