Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Shocking Viral Video: आजच्या काळात सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, आणि यात 'रील' बनवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

Manish Jadhav

Dangerous Stunt Video Viral: आजच्या काळात सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, आणि यात 'रील' बनवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. रील बनवणे चुकीचे नाही, पण अनेकदा लोक व्ह्यूज आणि लाईक्ससाठी मर्यादा ओलांडतात. काही लोक अश्लील कृत्य करतात, तर काहीजण आपला जीव धोक्यात घालून धोकादायक स्टंट्स करतात. लोकांना वाटते की, जितका जास्त धोकादायक किंवा धाडसी कंटेंट असेल, तितका त्यांचा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक तरुण एका पुलावर उभे आहेत. अंदाजे 20 ते 25 वयोगटातील हे सर्वजण आहेत. त्यातील एक तरुण पुलाच्या खाली लटकलेला दिसत आहे. त्याच्या पायाला एक कपडा बांधलेला आहे आणि तो कपडा पुलावर उभे असलेले तीन तरुण पकडून आहेत. त्याचवेळी, खाली नदीच्या पाण्यात एक मुलगी बुडत असल्याचा अभिनय करत आहे. तिला वाचवण्यासाठीच तो तरुण पुलाच्या खाली लटकल्याचे दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार पाहून हे सर्व रील बनवण्यासाठी केले जात असल्याचे स्पष्ट दिसते. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत आणि आजही लोक असे धोकादायक व्हिडिओ बनवत आहेत. काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवाशी खेळत आहेत.

यूजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @ChapraZila नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'व्हिडिओ बनवण्यासाठी सध्याचे तरुण किती मोठा धोका पत्करत आहेत.' ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 2 लाख 48 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले होते आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले, "हे तर निव्वळ मूर्खपणा आहे." दुसऱ्या एका युजरने या प्रवृत्तीवर उपरोधिक टिप्पणी करत लिहिले, "व्हिडिओ म्हणू नकोस, ती त्यांची नोकरी आहे, त्यातून पगार मिळतो." तिसऱ्या युजरने लिहिले की, "डॉलर मिळतात ना...म्हणून तर थार, फॉर्च्यूनर, दुबईची ट्रिप मिळते." यूजर्सच्या या प्रतिक्रिया अशा धोकादायक स्टंट्समागे असलेल्या व्यावसायिक हेतूवर प्रकाश टाकतात.

काळजी घेणे आवश्यक

सोशल मीडिया हे एक शक्तिशाली माध्यम आहे, जे आपल्याला मनोरंजनासोबतच माहिती आणि ज्ञान देते. पण, काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला जीव धोक्यात घालणे योग्य नाही. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ (Video) बनवताना अपघात झाल्याच्या आणि काही दुर्दैवी घटना घडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे, अशा धोकादायक स्टंट्सपासून दूर राहणे आणि आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी केवळ प्रसिद्धीसाठी धोकादायक कृत्ये करण्याऐवजी आपल्या कलागुणांचा योग्य वापर करुन सुरक्षित व्हिडिओ बनवण्यावर भर द्यायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT