Shashi Tharoor Injured: तिरूअनंतपुरमचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर संसद भवनात पडून जखमी झाले आहेत. यात थरूर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून पायाला प्लॅस्टर घालावे लागले आहे. खासदार थरूर यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी ट्विटरवरून रूग्णालयातील फोटो शेअर केला आहे.
थरूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "काल संसदेत जिना उतरत असताना माझा पाय घसरला आणि माझ्या पायाला दुखापत झाली. काही तास काही वाटले नाही, पण नंतर वेदना वाढल्याने मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. मी आता हॉस्पिटलमध्ये आहे. आज संसदेत येऊ शकत नाही. तसेच मतदारसंघातील पूर्वनियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत."
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनासाठी थरूर दिल्लीत उपस्थित आहेत. तवांग प्रकरणावर थरूर यांनी सरकारवर निशाणा साधला होता. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील चकमकीबाबत सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. कोणतेही स्पष्टीकरण न देता एक छोटे वक्तव्य केले गेले आणि इतरांचे प्रश्न किंवा विचारही ऐकले गेले नाहीत. ही लोकशाही नाही. आम्ही म्हणत आहोत की संसद ही चर्चेसाठी आहे. सरकारने अशा घटनांमध्ये भारतातील जनतेला उत्तरदायी असले पाहिजे." सरकारने संपूर्ण परिस्थिती स्पष्ट असे थरूर म्हणाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.