दिल्लीत 17 वर्षांच्या मुलीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर, अभिनेत्री कंगना रणौतने तिची बहीण रंगोली चंदेलचा भयानक अनुभव संगळ्यांसोबत शेअर केला आहे. रंगोली 21 वर्षांची होती जेव्हा तिच्यावर अॅसिड हल्ला झाला आणि ती थर्ड डिग्रीपर्यंत भाजली होती. कंगनाने नमूद केले होते की त्यावेळी रांगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, आणि तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती, एक कान आणि छातीवरही बऱ्याच प्रमाणात भाजले होते. (Delhi Acid Attack)
तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनुभव सांगताना कंगनाने लिहिले, “मी किशोरवयीन असताना माझी बहीण @rangoli r वर रस्त्याच्या कडेला असलेल्या रोमियोने अॅसिड हल्ला केला होता. तिला 52 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, अकल्पनीय मानसिक आणि शारीरिक आघात यावेळी तिच्यावर झाला. एक कुटुंब म्हणून आम्ही उद्ध्वस्त झालो होतो. मला थेरपी देखील करावी लागली कारण मला भीती वाटत होती की माझ्याजवळून जाणारा कोणीही माझ्यावर अॅसिड फेकून देईल ज्यामुळे मी प्रत्येक वेळी दुचाकीस्वार, कार, अनोळखी व्यक्ती मला ओलांडून जात असेल तर मी माझ्या चेहरा झाकून घ्यायचे. हे अत्याचार अजूनही थांबलेले नाहीत. सरकारने या गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. मी @gautamgambhir55 यांच्याशी सहमत आहे, आम्हाला अॅसिड हल्लेखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची गरज आहे.”
मंगळवारी, बाईकवर आलेल्या दोघेजण तोंड झाकलेल्या व्यक्तींनी दिल्लीच्या द्वारका येथे एका 17 वर्षाच्या मुलीवर अॅसिडने हल्ला केला, ती तिच्या शाळेत जाण्यासाठी निघाल्यानंतर काही मिनिटांतच ही घटना घडली होती. माहितीनुसार, मुलगी आठ टक्के भाजली असून तिच्यावर सफदरजंग हॉस्पिटलच्या बर्न आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपीने पीडितेवर नायट्रिक अॅसिड फेकले असावे असा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.