Delhi Acid Attack: आरोपींनी फ्लिपकार्टवरून मागवले अ‍ॅसिड; पीडीतेचा चेहरा 8 टक्के भाजला, डोळे खराब

पोलिसांनी पाठवली नोटीस, दिल्ली महिला आयोगाची अ‍ॅमेझॉनला नोटीस
Delhi Acid Attack
Delhi Acid AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Acid Attack: राजधानी दिल्लीत 12 वीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याने दिल्ली पुन्हा हादरून गेली होती. ज्या अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केले त्यांनी हे अ‍ॅसिड फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावरून मागवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आता फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मलाच नोटीस पाठवली आहे.

Delhi Acid Attack
'Nitish Kumar' on death due to Alcohol: 'जो पिणार तो मरणार' दारुने होणाऱ्या मृत्युवर 'नितीश कुमार' यांची प्रतिक्रिया

हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या चेहऱ्याचा 8 टक्के भाग भाजला आहे. डोळ्यांनाही इजा झाली आहे. सध्या ती शुद्धीवर आली आहे. सफदरजंग रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन तिच्यावर उपचार करत आहेत.

दिल्लीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, सचिनने फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड मागवले होते. पेमेंटसाठी त्याने फ्लिपकार्टचे ई-वॉलेट वापरले. मात्र, यासंदर्भात फ्लिपकार्टकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ही घटना 14 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता द्वारका परिसरात घडली. तरुणी आपल्या लहान बहिणीसोबत जात असताना दुचाकीवरून दोघेजण आले. मागे बसलेल्या मुलाने अ‍ॅसिड फेकले.

Delhi Acid Attack
Mukhtar Ansari: गँगस्टर मुख्तार अन्सारीला न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सचिन अरोरा (20 वर्षे), हर्षित अग्रवाल (19 वर्षे) आणि वीरेंद्र सिंग (22 वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. सचिन हा मुख्य आरोपी असून, त्याने हर्षित आणि वीरेंद्रच्या मदतीने हा गुन्हा केला. या तिघांनीही माध्यमांसमोर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले आहे.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाने अ‍ॅमेझॉन या ईकॉमर्स संकेतस्थळाला नोटीस पाठवली आहे. दिल्ली महिला आयोगाने (DCW) नोटीसीत लिहिले आहे की, आरोपीने फ्लिपकार्टवरून अ‍ॅसिड विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती, पण Amazon आणि Flipkart सारख्या प्लॅटफॉर्मवर ते सहज उपलब्ध आहे. तुमच्या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅसिड विकण्याचे कारण द्या, असे आयोगाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com