Bilal Gani Loan Dainik Gomantak
देश

Kashmir मधून होणार हुर्रियतचा सफाया? या फुटीरतावादी नेत्याची राजकारणात एन्ट्री

Jammu And Kashmir: फुटीरतावादी नेते आणि जम्मू-काश्मीर पीपल्स इंडिपेंडंट मूव्हमेंटचे अध्यक्ष बिलाल गनी लोन मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: फुटीरतावादी नेते आणि जम्मू-काश्मीर पीपल्स इंडिपेंडंट मूव्हमेंटचे अध्यक्ष बिलाल गनी लोन मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता आहे. बिलाल गनी लोन हे ज्येष्ठ फुटीरतावादी नेता अब्दुल गनी लोन यांचे पुत्र आहेत. अब्दुल गनी यांची 21 मे 2002 रोजी श्रीनगरमधील ईदगाह येथे हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, 'दिवंगत अब्दुल गनी लोन यांचा मुलगा बिलाल येत्या काही दिवसांत औपचारिकपणे मुख्य प्रवाहात येणार आहेत.'

तर एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, "त्यांचे वडील फुटीरतावादी गटात सामील होण्यापूर्वी तीनदा आमदार राहीले आहेत. त्यामुळे, जर बिलाल मुख्य प्रवाहात आले तर त्यांना त्यांचा वारसा पुन्हा नव्याने मिळेल. विशेषत: अशा वेळी जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिलाल गनी लोन हे काश्मिरी नेता सज्जाद लोन यांचे बंधू आहेत.''

वृत्तानुसार, लोन लवकरच हुर्रियत कॉन्फरन्समधून बाहेर पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्या मूळ ‘गड’ मानल्या जाणाऱ्या उत्तर काश्मीरमधून लढवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. राजकीय विश्लेषकांनी नाव न छापण्याच्या आधारावर एका स्थानिक मीडिया हाऊसला सांगितले की, "बिलाल लोन यांनी मुख्य प्रवाहात सामील होणे हे एक मोठे पाऊल असेल, कारण त्यांचा भाऊ सज्जाद लोन यांनी फुटीरतावादी राजकारणाला निरोप दिल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात ही मोठी घडामोड असेल."

दुसरीकडे, ही घडामोडी काश्मीर खोऱ्यातील राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. हुर्रियत आणि फुटीरतावादी राजकारण दिवसेंदिवस अप्रचलित होत आहे. जर बिलाल लोन मुख्य प्रवाहात सामील झाले तर इतर फुटीरतावादी नेतेही त्यांच्या निर्णयावर नक्कीच विचार करतील. अनेक नेते फुटीरतावादाशी संबंध तोडून राजकारणात येऊ शकतात. कारण खोऱ्यातून फुटीरतावाद संपत चालला आहे. अशा परिस्थितीत फुटीरतावादी नेत्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात सामील होण्याशिवाय पर्याय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद

Goa Dams: ‘साळावली’, ‘अंजुणे’ची होणार दुरुस्‍ती! 58 कोटींचा निधी मंजूर; DPR तयार

Goa Politics: खरी कुजबुज; हाऊस फूल इस्पितळ

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

SCROLL FOR NEXT