CJI Chandrachud Dainik Gomantak
देश

Supreme Court: सुनावणीदरम्यान CJI चंद्रचूड यांच्यासमोर सादर केल्या व्हिस्कीच्या बॉटल्स, पुढे काय झाले ते तुम्हीच वाचा!

CJI Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड अनेक महत्त्वाच्या सुनावणीचा भाग राहिले आहेत. त्यांचे निर्णय आणि टिप्पण्या सतत व्हायरल होत असतात.

Manish Jadhav

CJI Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड अनेक महत्त्वाच्या सुनावणीचा भाग राहिले आहेत. त्यांचे निर्णय आणि टिप्पण्या सतत व्हायरल होत असतात. त्याचप्रमाणे शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. वास्तविक, दोन मद्य कंपन्यांमध्ये ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाची सुनावणी सुरु होती. दरम्यान, सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बॉटल्स सादर करण्यात आल्या. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी या बॉटल्स सरन्यायाधीशांसमोर ठेवल्या.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सीजेआयच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपीलावर सुनावणी सुरु होती. यामध्ये, इंदूरस्थित कंपनी जेके एंटरप्रायझेसला लंडन प्राईड नावाने शीतपेय बनवण्यापासून रोखण्याचे मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डचे आवाहन फेटाळण्यात आले.

याच सुनावणीदरम्यान दोन्ही बॉटल्स CJI आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासमोर सादर करण्यात आल्या. यानंतर सरन्यायाधीश मोठ्याने हसले आणि म्हणाले की, तुम्ही बॉटल्स आणल्या आहेत? नंतर सरन्यायाधीशांना विचारण्यात आले की, ते सादर केलेल्या दोन्ही बॉटल्स घेऊ शकतात का? यावर सरन्यायाधीशांनी हसत हसत उत्तर दिले की हो कृपया घ्या. यानंतर रोहतगी यांनी उत्तर दिले की, त्यांना दोन्ही उत्पादनांमध्ये साम्य दाखवावे लागेल. यानंतर त्यांनी या प्रकरणात ट्रेडमार्कचे उल्लंघन कसे झाले हे सांगितले. यानंतर खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आणि दोन आठवड्यांनी सुनावणी निश्चित केली.

सरन्यायाधीशांनी वकिलाला फटकारले

अलीकडेच CJI चंद्रचूड चर्चेत आले जेव्हा त्यांनी एका वकिलाला मोठ्या आवाजात बोलल्याबद्दल फटकारले. आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत असे आतापर्यंत घडलेले नाही, त्यामुळे यापुढेही असे घडणार नाही, असे CJI यांनी स्पष्ट केले होते. एका सुनावणीदरम्यान, सीजेआयने वकिलाला कमी आवाजात बोलण्यास सांगितले होते. तुम्ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करत आहात. आवाज कमी कर, नाहीतर कोर्टातून तुम्हाला बाहेर काढले जाईल. वकिलाच्या सामान्य कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी विचारले की, "तुम्ही सहसा कुठे हजर होतात? तुम्ही प्रत्येक वेळी न्यायाधीशांवर असेच ओरडता का?" त्यांनी जोर दिला, "कृपया आधी तुमचा आवाज कमी करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा आवाज वाढवून आम्हाला घाबरवू शकता, तर तुम्ही चुकीचे आहात. हे 23 वर्षांत घडले नाही आणि माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही असे होणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

SCROLL FOR NEXT