Seema Haider-Sachin Meena Love story: उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरसह तिचा साथीदार सचिन मीणा आणि तिचे वडील नेत्रपाल सिंग यांना ताब्यात घेतले.
सीमा हैदरला जुलैच्या सुरुवातीला तिच्या चार मुलांसह भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, तर सचिन मीना आणि त्याच्या वडिलांना त्यांना आश्रय दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
नोएडा येथील एटीएस कार्यालयात दोघांची तासन्तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान एजन्सीने त्याचा पासपोर्ट, त्याच्या मुलांचा पासपोर्ट आदी प्रश्न विचारले.
सीमा हैदरची अचानक भारतात एंट्री आणि तिच्या अनोख्या प्रेमप्रकरणामुळे अनेक लोकांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे.
UP ATS ने लखनौ येथे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या संशयित एजंटला त्याच्या हँडलर्सना भारतातील 'संरक्षण आस्थापनांबद्दल गंभीर माहिती' पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केल्याच्या एका दिवसानंतर सीमा हैदरला अटक करण्यात आली.
ग्रेटर नोएडामधील एका गटाने चार मुलांसह अवैधरित्या भारतात घुसलेल्या सीमा हैदरला 72 तासांच्या आत हद्दपार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर यूपी एटीएसने सीमा हैदरची चौकशी सुरू केली.
वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सीमा हैदरची सोमवारी एटीएसकडून चौकशी करण्यात आली. स्थानिक पोलिसांचा त्यात सहभाग नव्हता.
अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक पोलिस या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत असून अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही.
यूपी एटीएस सीमा हैदर आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपूर्ण पार्श्वभूमीची चौकशी करत आहे. त्यां नीने भारतात येण्यासाठी निवडलेल्या मार्गाचे नेटवर्क आणि विविध देशांत फिरताना वापरलेला मोबाइल क्रमांक याची वेगवेगळ्या अॅंगलमधून तपासणी केली जात आहे.
सीमा हैदर सिंध, पाकिस्तानची रहिवासी आहे. ती 27 वर्षांची असून चार मुलांची आई आहे. 2020 मध्ये, भारतातील 22 वर्षीय सचिन मीणा याच्याशी कोरोना साथीच्या काळात ऑनलाइन गेम PUBG खेळताना ओळख झाली आणि त्यानी नेपाळमध्ये लग्न केले.
सीमा आपल्या मुलांसह पाकिस्तान सोडून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचा आरोप आहे. सीमा आणि सचिन नेपाळमध्ये पहिल्यांदा भेटले होते. आणि मे महिन्यात सीमा आणि तिची मुले दुबई, नेपाळमार्गे नोएडा येथे आली.
सचिनने त्यांना स्वीकारले आणि ते नवी दिल्लीपासून सुमारे 55 किमी अंतरावर असलेल्या ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा गावात भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी लग्न केले आहे आणि त्यांना भारतात एकत्र राहायचे आहे.
परदेशात सौदी अरेबियात काम करणारा पती गुलाम हैदरला त्याची पत्नी आणि मुलांसोबत पुन्हा एकत्र येण्याची इच्छा आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पत्नी सीमाला परत पाकिस्तानला पाठवावे असे आवाहन केले.
सीमाच्या एका हिंदू मुलासोबत राहण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानमधील तिच्या समुदायातील लोक संतप्त झाले आहेत. सीमाचे घर पाकिस्तानातील गुलिस्तान-ए-जौहरमधील भिट्टयाबाद या झोपडपट्टीत आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून सीमाला धमकीचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर रविवारी सिंध प्रांतात मंदिरासह हिंदूंवर हल्ला झाला. हा हल्ला रॉकेट लाँचरने करण्यात आला. यानंतर भारतातील तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या.
पाकिस्तानमध्ये सीमाचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी सामाजिक नियम मोडण्याचे धाडस केल्याबद्दल तिला बहिष्कृत केले आहे.
लोकांनी सीमाला तिच्या मुलांना पाकिस्तानात पाठवण्याचा आणि सीमाला भारतात राहण्याचा सल्ला दिला आहे. ती पाकिस्तानात परत आली तरी आम्ही तिला माफ करणार नाही, असे लोक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.