Seema Haider Dainik Gomantak
देश

Seema Haider In 2024 Election: खासदारकीची निवडणूक लढवणार सीमा हैदर? एनडीएच्या मित्रपक्षाकडून मोठी ऑफर

Seema Haider: पाकिस्तानातून आपल्या PUBG प्रियकरासाठी चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे.

Manish Jadhav

Seema Haider In 2024 Election: देशभरात मागील काही दिवसांपासून सीमा हैदरची प्रेमकहाणी चर्चेत आहे. पाकिस्तानातून आपल्या PUBG प्रियकरासाठी चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे.

सीमा सध्या तिचा प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत आहे. सीमावर पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोपही करण्यात आला होता, काहींनी ती प्रेमासाठी वेडी असल्याचे म्हटले होते. आता बातम्या येत आहेत की, सीमा हैदर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची निवडणूक लढवू शकते.

एनडीएचा मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून सीमाला ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. सीमानेही ही ऑफर मान्य केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची कहाणी दोन्ही देशात सगळ्यांच्याच ओठावर आहे. एकीकडे अंजूला प्रेमाने एवढी भुरळ घातली की पती आणि दोन मुलं सोडून पाकिस्तानात (Pakistan) तिचा फेसबुक प्रियकर नसरुल्लाहची 'फातिमा' बनली.

तिथे आता तिच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे. तिला नोकरीच्या ऑफरही आल्या आहेत. त्याचवेळी, पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचीही क्रेझ कमी झाली नाही. काही दिवसांपूर्वी सीमा आणि सचिन मीनाला नोकरीच्या ऑफर आल्या होत्या.

आता, सीमा हैदर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Election) खासदारकीची निवडणूक लढवू शकते अशी चर्चा आहे. वृत्तानुसार, सीमा हैदरला एनडीएचा सहयोगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. विशेष म्हणजे, सीमानेही पक्षाचा हा प्रस्ताव मान्य केला आहे.

महिला संघटनेचे प्रवक्तेपद देऊ केले

सीमा हैदरला पक्षाकडून निमंत्रण मिळाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी दिली. सीमाला महिला संघटनेचे अध्यक्ष केले जाऊ शकते. तिची भाषेवर चांगली हुकूमत आहे. त्यामुळे तिला पक्षाचे प्रवक्तेपदही दिले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT