Indian Railway Recruitment 2026 Dainik Gomantak
देश

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

SECR Railway Apprentice Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

SECR Railway Apprentice Recruitment 2026: भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) बिलासपूर यांनी विविध ट्रेड्स अंतर्गत 'ट्रेड अप्रेंटिस' पदांच्या तब्बल 1191 जागांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली.

जे तरुण रेल्वेमध्ये तांत्रिक कौशल्य शिकून आपल्या करिअरला एक नवीन आणि योग्य दिशा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे मेरिट लिस्टच्या म्हणजेच गुणवत्ता यादीच्या आधारावर केली जाणार आहे. या अप्रेंटिसशिप प्रोग्रामच्या माध्यमातून उमेदवारांना रेल्वेच्या तांत्रिक विभागात प्रात्यक्षिक ज्ञान आणि दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 12 मे 2026 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2026 आहे.

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड करण्यासाठी दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण (किमान 50 टक्के गुणांसह) आणि आयटीआय (ITI) परीक्षेतील गुण यांची सरासरी गोळाबेरीज करुन एक अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल. ज्या उमेदवारांचे नाव या मेरिट लिस्टमध्ये येईल, त्यांना पुढील टप्प्यात कागदपत्र पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय चाचणीसाठी (Medical Test) बोलावले जाईल.

या प्रक्रियेत मुख्यत्वे फिटर (Fitter), वेल्डर (Welder), टर्नर (Turner), इलेक्ट्रिशियन (Electrician), कॉम्प्युटर ऑपरेटर (COPA), स्टेनोग्राफर (हिंदी/इंग्रजी), डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) आणि कारपेंटर (Carpenter) यांसारख्या अनेक तांत्रिक ट्रेड्सचा समावेश आहे. उमेदवार आपल्या आयटीआय पदवीनुसार संबंधित ट्रेडसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असावी, तसेच, संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम apprenticeshipindia.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर रेल्वेच्या secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 'SECR RRC Bilaspur Apprentices Recruitment 2026' या लिंकवर क्लिक करावे लागेल. तिथे मागितलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरुन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. जर तुमच्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क लागू असेल, तर ते ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. शेवटी फॉर्म सबमिट करुन भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून आपल्याकडे सुरक्षित ठेवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT