Railway Recruitment 2025: 10वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; 6180 पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Railway Jobs 2025 Apply: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) लवकरच ६,१८० रिक्त जागांवर भरती करणार आहे.
Railway Recruitment 2025
Railway Recruitment 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Railway Jobs

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) लवकरच तंत्रज्ञ ग्रेड १ (सिग्नल) आणि तंत्रज्ञ ग्रेड ३ (ओपन लाईन) या पदांसाठी एकूण ६,१८० रिक्त जागांवर भरती करणार आहे.

या संदर्भातील अधिसूचना जारी झाली असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २८ जून २०२५ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ जुलै २०२५ आहे. नवीन भरती अंतर्गत रिक्त जागांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

तंत्रज्ञ ग्रेड १ (सिग्नल) या पदासाठी एकूण १८० रिक्त जागा उपलब्ध आहेत. तसेच, तंत्रज्ञ ग्रेड ३ (ओपन लाईन) या पदासाठी एकूण ६,००० रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे, या दोन्ही पदांसाठी मिळून ६,१८० रिक्त जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

Railway Recruitment 2025
Goa Drowning Deaths: चिंताजनक! गोव्यात साडेपाच महिन्यांत 51 जणांचा बुडून मृत्यू; सासष्‍टी, धारबांदोडात धोक्याची घंटा

शैक्षणिक पात्रता

तंत्रज्ञ ग्रेड ३ साठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

तंत्रज्ञ ग्रेड १ (सिग्नल) साठी उमेदवारांकडे B.Sc. (भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, IT, कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा BE/BTech/३ वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा असावा.

वयोमर्यादा आणि वेतन

या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वयोमर्यादा वेगळी आहे. तंत्रज्ञ ग्रेड ३ पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे, तर तंत्रज्ञ ग्रेड १ (सिग्नल) पदासाठी वयोमर्यादा १८ ते ३६ वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच, शासकीय नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

तंत्रज्ञ ग्रेड १ (सिग्नल) या पदासाठी दरमहा ₹२९,२००/- मूळ वेतनासह इतर शासकीय भत्ते लागू होतील. दुसरीकडे, तंत्रज्ञ ग्रेड ३ पदासाठी दरमहा ₹१९,९००/- मूळ वेतनासह भत्त्यांचा समावेश असेल.

Railway Recruitment 2025
Goa Dain Damage: हॉटेलचे छप्पर कोसळले, 3 घरांची मोडतोड; गोव्यात पावसामुळे नुकसानीचे सत्र सुरूच

अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹५००/-, तर SC, ST, महिला आणि दिव्यांग (PH) उमेदवारांसाठी ₹२५०/- इतके आहे. मात्र, स्टेज १ परीक्षा दिल्यानंतर, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ₹४००/-, आणि इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना पूर्ण ₹२५०/- परत करण्यात येणार आहेत.

निवड प्रक्रिया ही पूर्णतः लेखी परीक्षेच्या आधारे होणार आहे. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि इतर अटी लवकरच रेल्वे भरती मंडळाच्या (RRB) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर माहिती तपासत राहावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com