Supreme Court Dainik Gomantak
देश

'मुलाला ताबडतोब USA ला पाठवा...', पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला SC ने दिले आदेश

Supreme Court: अमेरिकास्थित वडिलांकडे सोपवण्यास नकार देणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बेंगळुरुस्थित एका महिलेला तिच्या 11 वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्याचे आणि त्याचे जन्मस्थान असलेल्या यूएसला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती ए. न्यायमूर्ती एम. खानविलकर आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने मुलाला अमेरिकास्थित वडिलांकडे सोपवण्यास नकार देणारा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला.

दरम्यान, निकाल लिहिताना न्यायमूर्ती रविकुमार म्हणाले, "मुलगा हा जवळपास 11 वर्षांचा आहे. तो यूएस पासपोर्ट धारक आणि यूएस नागरिक आहे. त्याचे पालक म्हणजे अपीलकर्ते हे कायमस्वरुपी यूएस निवासी कार्डधारक आहेत. या बाबींवर योग्य लक्ष दिले गेले नाही.''

दुसरीकडे, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "आईने हे सुनिश्चित केले पाहिजे की, मूल ताबडतोब अमेरिकेत परतले आहे. त्याचबरोबर अपीलकर्त्या वडीलांनी त्यांच्या मुलाला परत यूएसला नेण्यासाठी कायद्यानुसार आवश्यक पावले उचलली पाहिजेत."

तसेच, निकालानुसार, या जोडप्याचे 2008 मध्ये भारतात (India) लग्न झाले होते. त्यानंतर ते अमेरिकेत (America) स्थायिक झाले. त्यांना ग्रीन कार्डही मिळाले. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आला. वडिलांच्या संमतीशिवाय मुलाला आईने भारतात आणले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT