Dalbir Kaur  Dainik Gomantak
देश

दलबीर कौर यांचे निधन, सरबजीत सिंग यांच्या सुटकेसाठी दिला होता लढा

पाकिस्तानमधील तुरुंगात कैद्यांबरोबर झालेल्या मारहाणीत सरबजीत सिंग यांचा 2013 मध्ये मृत्यू झाला.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानमधील तुरुंगात कैद्यांबरोबर झालेल्या मारहाणीत सरबजीत सिंग यांचा 2013 मध्ये मृत्यू झाला. यातच सरबजीत यांची बहीण दलबीर कौर (Dalbir Kaur) यांचे निधन झाले आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या. दलबीर कौर प्रसिद्धीच्या झोतात आल्या जेव्हा त्यांनी आपल्या भावाच्या पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटकेसाठी अर्ज केला होता. सरबजीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बॉम्बस्फोटात सहभागी असल्याबद्दल 1991 पासून तुरुंगात होते. (sarabjit singh sister dalbir kaur passes away)

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कौर यांनी शनिवारी रात्री छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना तात्काळ अमृतसरमधील (Amritsar) एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.

सरबजीत सिंग यांची मुलगी पूनम यांनी सांगितले की, 'दलबीर गेल्या एक वर्षापासून फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि काही वेळानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. काही तासांनंतर दलबीर यांना मृत घोषित करण्यात आले.'

सरबजीत यांच्यावर तुरुंगात हल्ला

लाहोर जेलमध्ये कैद्यांनी हल्ला केल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी सरबजीत सिंग (49) यांचा मृत्यू झाला. तुरुंगात सरबजीत यांच्यावर कैद्यांनी धारदार हत्यारांनी हल्ला केला, ज्यामध्ये ते कोमात गेले होते. सरबजीत यांना पाकिस्तानी न्यायालयाने दहशतवाद (Terrorism) आणि हेरगिरीप्रकरणी दोषी ठरवले होते. 1991 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तथापि, पाकिस्तान सरकारने 2008 मध्ये त्यांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT