देशातील हिंसाचारास 'पाकिस्तान' जबाबदार, भाजप नेत्याचा दावा

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सध्या मुहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.
Union Minister Prahlad Patel
Union Minister Prahlad PatelDainik Gomantak

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सध्या मुहम्मद पैंगबर यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक भागात निदर्शने करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. देशभरात झालेल्या निदर्शनांसाठी त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. (Nupur Sharma Union Minister Prahlad Patel Said Pakistan Is Behind The Violence In The Country We Have To Be Alert)

दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल शनिवारी जबलपूरमध्ये होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, ''तुम्हालाही माहिती आहे, देशातील राजकीय पक्षांनाही माहिती आहे की, काही लोकांना देशातील शांतता भंग करायची आहे. भारताच्या (India) वाढत्या प्रतिष्ठेचा मत्सर करणारे असे करत आहेत. हिंसा करणारे कोण आहेत? तो आपला शेजारी देश पाकिस्तान आहे.''

Union Minister Prahlad Patel
Kanpur Violence: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंसाचार, वाचा संपूर्ण प्रकरण

सोनिया गांधींवर निशाणा

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस (Congress) सुप्रीमो सोनिया गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, ''ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेस खासदारांची प्रस्तावित निदर्शने ही चौकशी टाळण्यासाठी ढाल आहेत. सोनिया गांधींनी या प्रकरणात पक्षाची ढाल करु नये.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com