Samastipur Suicide case
Samastipur Suicide case Twitter
देश

समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची आर्थिक संकटामुळे गळफास घेऊन आत्महत्या

दैनिक गोमन्तक

बिहारमधील (Bihar) समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी फासावर लटकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बुरारी प्रकरणात ज्याप्रकारे संपूर्ण कुटुंबच फासावर लटकत सापडले होते, तसाच एक प्रकार समस्तीपूरमध्ये समोर आला आहे. हे खळबळजनक प्रकरण विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ गावचे आहे. (Samastipur Suicide case)

आर्थिक विवंचनेला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांच्या आत्महत्येच्या बातमीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. त्याचबरोबर एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

मऊ गावातील प्रभाग 11 मध्ये राहणारा मनोज झा ऑटो चालवून खैनी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. . त्यांच्या पश्चात आई सीता देवी, पत्नी सुंदरमणी देवी आणि दोन मुले असा परिवार आहे. सातत्याने प्रयत्न करूनही मनोज झा यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतच होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पैसे वसूल करणारे सतत त्याच्या घरी यायचे. आर्थिक विवंचनेमुळे संपूर्ण कुटुंबानेच हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्ज आणि आर्थिक संकटामुळे आत्महत्या

कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण न केल्यामुळे मनोज झा खूप अस्वस्थ होता. त्याने अनेक गटांकडून कर्जही घेतले होते. ते कर्ज मुदतीत भरू शकले नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने कुटुंबीयांसह घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभाग 11 मध्ये राहणारे मनोज झा (45), त्याची आई सीता देवी (65), मनोज झा यांची मुले सत्यम कुमार (10) आणि शिवम कुमार (07), मनोजची पत्नी सुंदरमणी देवी (३८) यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण नाकाबंदी केली. एफएसएल टीमला येथे पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT