Akhilesh Yadav Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Election: समाजवादी पक्षाने 'वचन पत्र' केले लाँच

समाजवादी पक्षाने 'वचन पत्र' जाहीर केले आहे. दरम्यान अखिलेश यादव यांनी महिला, शेतकरी आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या वचनपत्रामधून केले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Election) समाजवादी पक्षाने मंगळवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. समाजवादी पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, ''सर्व पिकांसाठी एमएसपी देण्यात येईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 15 दिवसांच्या आत पैसे दिले जातील. सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज, बिनव्याजी कर्ज आणि विमामुक्त पेन्शनची व्यवस्था करण्यात येणार आहे.'' पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दर महिन्याला सर्व दुचाकी वाहनधारकांना एक लिटर पेट्रोल तर चारचाकी वाहनधारकांना तीन लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Samajwadi Partys manifesto launched Akhilesh Yadav woos women farmers and youth)

समाजवादी जाहीरनामा

  • सर्व पिकांसाठी एमएसपी अंतर्गत आणले जाईल.

  • 2025 पर्यंत सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील.

  • सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज.

  • शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना 25 लाख रुपये देणार.

  • सर्व गरिबांना दर महिन्याला दोन सिलिंडर मोफत दिले जातील.

  • सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

  • मुलींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत केले जाणार आहे.

  • -समाजवादी पेन्शन पुन्हा सुरु होईल.

  • महिलांच्या सुरक्षेसाठी 1090 परत आणण्यात येणार आहेत.

  • -महिला ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर एफआयआर नोंदवू शकतील.

  • कॅशलेस आरोग्य व्यवस्था आणणार.

  • गरिबांना वर्षाला 18000 रुपये पेन्शन दिली जाईल.

  • प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 'समाजवादी थाळी', याअंतर्गत 10 रुपयांत जेवणाची थाळी दिली जाईल.

  • रिक्षाचालकांना दरमहा दोन लिटर मोफत पेट्रोल.

  • -मुलींना पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण दिले जाईल.

  • शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

  • महिलांना दरवर्षी दोन मोफत सिलिंडर दिले जातील.

  • दरमहा 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.

  • कारागीर बाजार उभारण्यात येणार आहे.

  • उद्योगांसाठी सिंगल रूफ क्लीयरन्स प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

  • संपूर्ण यूपीमध्ये 24 तास वीज दिली जाणार आहे.

  • सर्व गावे आणि शहरांमध्ये मोफत वायफाय झोन तयार केले जातील.

  • 2027 पर्यंत दोन कोटी रोजगार निर्माण होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT