Salman Khan Dainik Gomantak
देश

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

Salman Khan Confession: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान भलेही अविवाहित असला तरी त्याला लवकरच बाप होण्याची तीव्र इच्छा आहे.

Manish Jadhav

Salman Khan On His Relationships: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान भलेही अविवाहित असला तरी त्याला लवकरच बाप होण्याची तीव्र इच्छा आहे. लवकरच आपण ही इच्छा पूर्ण करु, असा खुलासा त्याने नुकताच केला. 59 वर्षीय सलमानने हा मोठा खुलासा अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शो मध्ये केला. या शो मध्ये त्याच्यासोबत अभिनेता आमिर खान देखील उपस्थित होता. यावेळी, दोघांनी त्यांची मैत्री कशी सुरु झाली, याबद्दलच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टीही उघड केल्या.

'शो'दरम्यान सलमानने त्याच्या नात्यांच्या अपयशाबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, "यार, नाही जमलं तर नाही जमलं. जर कोणाला दोष द्यायचाच असेल, तर मी स्वतःलाच दोष देतो." नात्यांमध्ये जोडीदारांनी एकमेकांसोबत पुढे जावे, असेही त्याने सांगितले. तो पुढे म्हणाला, "जेव्हा एक जोडीदार दुसऱ्या जोडीदारापेक्षा जास्त पुढे जातो, तेव्हा त्यांच्यात मतभेद सुरु होतात आणि असुरक्षिततेची भावना वाढते. त्यामुळे त्यांनी एकत्रच पुढे गेले पाहिजे. दोघांनीही एकमेकांवरील ओझे कमी केले पाहिजे." बाप होण्याच्या इच्छेबद्दल बोलताना सलमान म्हणाला, "एक दिवस मला नक्कीच मुले होतील. शेवटी मुले तर होणारच, पुढे काय होते ते पाहूया."

आमिरने सांगितला मैत्रीचा किस्सा

याच 'शो' मध्ये आमिर खानने (Aamir Khan) सलमानसोबतच्या मैत्रीचा एक खास किस्सा सांगितला. तो म्हणाला, "माझ्या रीनासोबतच्या घटस्फोटादरम्यान सलमान पहिल्यांदाच माझ्या घरी आला होता. त्या दिवसापासून आमची मैत्री अधिक घट्ट झाली." त्याआधी तो सलमानबद्दल पूर्वग्रहदूषित (judgmental) होता, असेही आमिरने कबूल केले. विशेषतः 'अंदाज अपना अपना' (1994) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानसोबत वेळेसंबंधी दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. "मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छितो की, सुरुवातीला मी सलमानबद्दल कठोर आणि पूर्वग्रहदूषित होतो," असेही आमिरने सांगितले.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. मात्र, आज तो बॉलिवूडच्या (Bollywood) 'कल्ट कॉमेडी' चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटात करिश्मा कपूर, रवीना टंडन, परेश रावल आणि शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

SCROLL FOR NEXT