Salman Khan: गोव्यात सलमानचा बंगला? 'त्या टेकडीवर यापुढे नवीन बांधकामांना परवानगी नाही'

Candolim Panchayat: सिकेरी टेकडीवरचा विषय आजकालचा नसून साल १९८० पासूनचा आहे. सरकारने टेकडीवरील हॉटेल बांधकामाच्या उभारणीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय याआधीच घेतला होता.
Salman Khan Goa Bungalow
Salman Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Sinquerim hill construction ban

कळंगुट: कांदोळी पंचायत क्षेत्रातील सिकेरी येथील टेकडीवर यापुढे कुठल्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी न देण्याचा ठराव कांदोळी पंचायत मंडळाकडून घेण्यात आला असून त्याच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय तसेच पीडीए प्राधिकरणाला पाठविण्यात आल्याची माहिती सरपंच ब्लेझ फर्नांडिस यांनी दिली.

दरम्यान, येथील अतिसंवेदनशील तसेच जैवसंवर्धनात्मक असलेल्या टेकडीवर सरकारकडून कॅक्रीटचे जंगल उभारण्याऐवजी वनस्पतीजन्य महाबगीचा उभारण्यात यावा, अशी मागणी ठरावात करण्यात आली आहे.

दरम्यान, ताज हॉटेल्स ग्रुपला येथील लाखो चोरीस मीटर जमीन भाडेपट्टी तत्त्वावर देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता, तो निर्णय सरकारने तत्काळ मागे घ्यावा अन्यथा सेव सिकेरी नावाने जन-आंदोलन उभारण्याचे संकेत कळंगुट फोरम कडून सरकारला याआधीच देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी कांदोळी पंचायतीची सभा पार पडली व या सभेत सरपंच ब्लेझ फर्नांडिस व इतर पंचायत सदस्यांनी सिकेरी टेकडीवर कुठल्याही प्रकारच्या बांधकामास परवानगी न देण्याचा एकमुखी ठराव ‌मंजूर करून घेतला.

Salman Khan Goa Bungalow
Sinquerim Hill: सिकेरी टेकडी जपा अन्यथा... पर्यावरण संवेदनशील जागेत पंचतारांकित प्रकल्पाला विरोध, न्यायालयात जाण्याचा इशारा

टेकडीवर सलमानचाही बंगला...?

सिकेरी टेकडीवरचा विषय आजकालचा नसून साल १९८० पासूनचा आहे. सरकारने टेकडीवरील जमीन हॉटेल बांधकामाच्या उभारणीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय याआधीच घेतला होता व स्थानिक पंचायत मंडळाने साठ दिवसांच्या आत या प्रकल्पास मान्यता देण्याचे सूचित केले होते. अभिनेता सलमान खान यांचाही बंगला येथील टेकडीवर येत असल्याचे ऐकू येत आहे जर सलमानला परवानगी मिळत असेल तर ताज हॉटेल ग्रुपला का नाही, असा प्रश्‍न सरकारकडून विचारला जाऊ शकतो. सिकेरी टेकडीवरून घमासान सुरू झालेले असताना स्थानिक आमदार कुठे आहेत असा प्रश्‍न कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com