company gives biscuits and water instead of salary hike Dainik Gomantak
देश

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

Salary hike appraisal Reddit post viral: आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक पगारदार व्यक्ती वर्षभर कार्यालयात घाम गाळल्यानंतर एका चांगल्या पगारवाढीची (Appraisal) अपेक्षा करते.

Sameer Amunekar

आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक पगारदार व्यक्ती वर्षभर कार्यालयात घाम गाळल्यानंतर एका चांगल्या पगारवाढीची (Appraisal) अपेक्षा करते. मात्र, जर तुमच्या बॉसने तुम्हाला केबिनमध्ये बोलावून पगार वाढवण्याऐवजी लहान मुलांच्या वाढदिवसाला मिळणाऱ्या 'रिटर्न गिफ्ट'सारखी एक पिशवी हातात दिली, तर काय होईल? असाच एक धक्कादायक प्रकार एका कॉर्पोरेट कंपनीत घडला आहे. सोशल मीडिया डिस्कशन फोरम 'Reddit' च्या r/mildlyinfuriating या पेजवर एका दुःखी कर्मचाऱ्याने कंपनीकडून मिळालेल्या या अनोख्या 'अप्रेझल'चा फोटो शेअर केला आहे, जो इंटरनेटवर आगीसारखा पसरला असून खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रक्त उसळले आहे.

संबंधित कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये उपरोधिक टोला लगावत लिहिले आहे की, "पगार वाढवण्याच्या नावाखाली कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ही बॅग वाटली आहे." जेव्हा या कर्मचाऱ्याने ती बॅग उघडून पाहिली, तेव्हा आतील वस्तू पाहून त्याचे डोकेच चक्रावले. त्या पिशवीत कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा बोनस नव्हता, तर त्याऐवजी १ लीटर पाण्याची बाटली, एक पेन, एक टॉफी, बिस्किटाचा पुडा आणि एक छोटी गोल वस्तू होती. वर्षभर मेहनत केल्यानंतर कंपनीने केलेल्या या कौतुकामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला.

'हा तर कर्मचाऱ्यांचा अपमान'; नेटिझन्सचा संताप

या व्हायरल पोस्टमध्ये कंपनीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु हा अजब नजराणा पाहून नेटीझन्सनी संबंधित कंपनीवर टीकेची झोड उठवली आहे. एका युझरने लिहिले की, "यापेक्षा काहीच दिले नसते तर बरे झाले असते." दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, "हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अपमान करण्यासारखे आहे. अशा कंजूष कंपनीला दोन आठवड्यांचा नोटीस पिरेड न देता थेट नोकरी सोडावी." तर काहींनी म्हटले की, यापेक्षा चांगल्या वस्तू लोक आपल्या मुलांच्या वाढदिवसाला येणाऱ्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून देतात.

बोनसच्या नावावर चॉकलेट कुकी; आईने सोडली नोकरी

या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये एका अन्य युझरने त्याच्या आईच्या जुन्या कंपनीचा असाच एक डोळे उघडणारा किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितले की, "माझी आई एका कंपनीत एचआर (HR) विभागात कार्यरत होती. त्या कंपनीत मोठ्या अधिकाऱ्यांना तब्बल अडीच कोटी रुपयांचा भरघोस बोनस देण्यात आला. मात्र, दुसरीकडे सामान्य कर्मचाऱ्यांच्या हातात केवळ एक 'चॉकलेट चिप कुकी' (बिस्किट) थमावली गेली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्या एका बिस्किटासाठी सर्वांना रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले. सामान्य कर्मचाऱ्यांचा हा अपमान माझ्या आईला सहन झाला नाही आणि तिने तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT